छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
उरण-मुंबई रेल्वे प्रवास स्वस्त; पार्किंग महाग
उरण : उरण तालुक्यातील प्रवासी जनतेसाठी उरण ते मुंबई दरम्यान रेल्वे सेवा काही दिवसांपासून सुरु झाल्याने, उरणकर प्रवासी सुखावले आहेत. मात्र, उरण ते मुंबई दरम्यान रेल्वे प्रवास करण्याचा खर्च जरी स्वस्त असला तरी रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळ चालकांकडून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. त्यामुळे ‘उरण-मुंबई रेल्वे प्रवास स्वस्त पण पार्किंग महाग', असे म्हणण्याची वेळ ‘उरण-मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आली आहे.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी उरण तालुवयातील रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळ चालकांकडून सुरु असलेल्या लूटमारीच्या गंभीर बाबीकडे प्रत्यक्षात लक्ष घालून पार्किंग व्यवस्थेकडून होणारी लूटमार थांबवावी, अशी मागणी उरण ते मुंबई दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासी जनतेकडून केली जात आहे.
उरण तालुवयातील बोकडवीरा, रांजणपाडा येथील रेल्वे स्थानकांवर पार्किंग व्यवस्था करणाऱ्या ठेकेदाराकडून टू-व्हीलर, थ्री-व्हीलर, फोर-व्हीलर या वाहनांसाठी पार्किंगचे दर अनुक्रमे २० रुपये, ४० रुपये, ६० रुपये असे आकारण्यात येत असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे पार्किंगच्या नावाखाली स्थानिक वाहन चालक नागरिकांची लूट चालवण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदार आणि वाहन चालक यांच्यात नेहमीच शाब्दिक बाचा-बाची होत असल्याचे चित्र उरण तालुवयातील रेल्वे स्थानकातील वाहनतळावर नेहमीच दिसते. मुंबई ते उरण येऊन- जाऊन रेल्वे प्रवास तिकिट ४० रुपये आहे. मात्र, वाहन पार्किंगसाठी ६० रुपये भरावे लागत आहेत. उरण ते मुंबई दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या प्रवासापेक्षा अधिक रुपये पार्किंग मालकाला मोजावे लागत आहेत. रेल्वेच्या प्रवास भाड्यापेक्षा जर पार्किंगचा खर्च जास्त येत असेल तर रेल्वे प्रवाशी रेल्वे प्रवासापासून दुरावतील, अशी चर्चा रेल्वे प्रवाशांमध्ये सुरु आहे.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी उरण तालुवयातील रेल्वे स्थानकातील वाहनतळावर आकारण्यात येणाऱ्या पार्किंग दराच्या गंभीर बाबीकडे लक्ष घालून रेल्वे प्रवासी वाहन चालकांची होणारी पार्किंग लुटमार थांबवावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशी करीत आहेत.