आपत्ती काळातील मदतीसाठी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज

ठाणे : ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीने मदत पोहोचविण्यासाठी तसेच आपद्‌ग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर, बहुउद्देशीय लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट, डिझाटर किट, बॉडी कव्हर बॅग आदी आवश्यक साहित्याचे वाटप प्राधिकरण तर्फे करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ‘आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण'चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली.

पावसाळा काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणे, पूरपरिस्थिती निर्माण होणे, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते. नैसर्गिक आपत्ती काळात तातडीने मदत पोहचविण्यासाठी आणि संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते. ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नैसर्गिक आपत्ती काळात आवश्यक असलेले विविध प्रकारचे साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालयांना वाटप करुन सदर साहित्य दरडप्रवण गावे, पूररेषेजवळील गावांना दिले जाते. या वर्षी प्राधिकरण तर्फे फोल्डिंग मल्टिपर्पज स्ट्रेचर (१७०५ संच), पलोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर आणि इतर साहित्य (७१० संच), आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य/रेस्क्यू किट (५५० संच), बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (१२६० संच) आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट (११९०संच) या साहित्याचे वाटप दरडप्रवण गावे, पूररेषेजवळील गावांना करण्यात आले आहे.

ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तर्फे यावर्षी ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका, मिरा-भाईंदर महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांना प्रत्येकी ६० बहुद्देशीय स्ट्रेचर (मोठे), २५ मध्यम आकाराचे स्ट्रेचर, ४० पलोटिंग अँड पलोडिंग स्ट्रेचर, २५ डिझास्टर मॅनेजमेंट किट, ६० बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, ५० बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) आणि १० बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, ५० बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) देण्यात आले आहेत. तर ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड तहसील कार्यालये आणि मिरा-भाईंदर अपर तहसील कार्यालयांना प्रत्येकी १०० बहुद्देशीय स्ट्रेचर (मोठे), ४० मध्यम आकाराचे स्ट्रेचर, ५० पलोटिंग अँड पलोडिंग स्ट्रेचर, ५० डिझास्टर मॅनेजमेंट किट, १०० बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, १०० बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) आणि १० बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, ५० बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) देण्यात आले आहेत, असे सुदाम परदेशी यांनी सांगितले.

आपत्त्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पूरग्रस्त आणि दरडप्रवण गावांना दिलेल्या साहित्य कसे वापरावे, त्याची देखभाल कशी करावी याचे प्रशिक्षणही संबंधित गावातील कर्मचारी, आपदामित्र आणि साहित्य वापरणारे कर्मचारी यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, ठाणे महापालिका आपत्ती निवारण दल, नागरी संरक्षण दल आणि सामाजिक संस्था मधील तज्ज्ञांकडून देण्यात येणार आहे.

आपत्त्कालीन परिस्थितीत संकटग्रस्तांना तातडीने मदतीसाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी पूरग्रस्त आणि दरडप्रवण गावांना दिलेले साहित्य उपयुक्त ठरणार आहे, असे सुदाम परदेशी आणि ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नैना क्षेत्रातील 74 अनधिकृत जाहिरात फलकांविरुद्ध सिडकोची कारवाई