सर्व जाती-धर्म प्रचारकांकडून एकत्रित बुध्द जयंती साजरी

नवी मुंबई : ऐरोली ते पनवेल पर्यंतच्या सर्व जाती-धर्मपंताच्या नागरिकांनी एकत्रित येऊन नेरुळ, सेवटर-१२ मधील रामलीला मैदानात ऐतिहासिक असा बुध्द पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून भन्ते विमलकीती गुणसिरी (संस्थापक-मदनाम शाकूमुनी विजयासन बुध्दीस्ट सेमिनरी), प्रमुख वक्ते डॉ. महेश देवकर (पाली विभाग प्रमुख-सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे), एजाज सरगरोह (विश्वस्त-नूर मस्जिद वाशी), फादर डॉ. मायकल रोशारिओ (होली चर्च-वसई), सामाजिक कार्यकर्ते मधुकर म्हात्रे, प्रा. संजय सुर्यवंशी, ज्ञानी गुरविंदर सिंग (प्रमुख ग्रंथी गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा-खारघर), संविधान प्रचारक सुरेश सावंत, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त कवी-साहित्यिक उत्तम तरकसे, पत्रकार कल्याण हनवते, चंद्रकांत जगताप, एल. आर. गायकवाड, भास्कर पवार, डॉ. सौ. नीता गंगावणे, आदि अतिथी विचार मंचावर होते. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भगवान गौतम बुध्द आणि बुध्द धर्माचे विचार मांडले.

 सदर कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचालन सौ. प्रतिभा बादली यांनी केले. तर समितीचे अध्यक्ष जागेस सोमवार यांनी योग्य पध्दतीने नियोजन केले. यावेळी रामलीला मैदानातील प्रांगणात खूप मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या पुस्तक विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच कासार फाऊंडेशनच्या वतीने काही बुध्द तत्त्वज्ञानाची पुस्तके मोफत वाटण्यात आली. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने सर्व जाती, धर्म पंथाचे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता धमवंदना घेऊन करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांना यश