हार्डवेअर दुकानाला आग

नवीन पनवेल : पनवेल शहरातील टपाल नाका एमजी रोड येथील २ दुकानांना आग लागल्याने यात लाखोंचा ऐवज जळून खाक झाला. सुदैवाने या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र, एका पक्षाचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलातर्फे देण्यात आली.

टपाल नाका, प्लॉट नंबर १२६१, हुसैनी हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स पनवेल या हार्डवेअरच्या दुकानाला २० मे रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली. यावेळी हार्डवेअरच्या बाजुला असलेल्या बुऱ्हानी ट्रेडर्स या दुकानाला देखील आग लागली. या आगीची माहिती माजी नगरसेवक राजू सोनी आणि त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांनी अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.

यावेळी  सिडको अग्निशमन केंद्र-नवीन पनवेलच्या पथकाने दुकांनाना लागलेली आग पूर्णपणे विझवली. या घटनेवेळी शेजारी असलेल्या फिश टँक आणि पक्षी दुकानामधील १० पक्षी, ३५ फिश टँक (५०, ६० मासे असलेले) माशासह वाचवण्यात यश मिळाले आहे. फवत या आगीत एक पक्षी मृत झाला आहे.

दरम्यान, सदर आगीमध्ये दुकानातील हार्डवेअर मटेरियल जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खाडीकिनारी वाढले जलप्रदुषण