पनवेलकरांना मालमत्ता कर देयके देण्यास सुरुवात

पनवेल : पनवेल महापालिकेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्ताधारकांना ऑनलाईन पध्दतीने आणि प्रत्यक्ष मालमत्ता कराची देयके बजावण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रातील ज्या मालमत्ता धारकांना अद्यापपर्यंत मालमत्ता कराची देयके प्राप्त झालेली नाहीत, त्या मालमत्ता धारकांनी  panvelmc.org  किंवा PMC TAX APP वर नोंदणी करुन ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराची देयके डाऊनलोड करुन घ्यावीत, असे महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

तसेच ज्या मालमत्ताधारकांना ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कराची देयके प्राप्त करुन घेणे शक्य नाही, अशा मालमत्ताधारकांनी मुख्यालयात किंवा संबंधित प्रभाग कार्यालयामधून देयके उपलब्ध करुन घ्यावीत. ज्या मालमत्ताधारकांनी आपला मोबाईल नंबर मालमत्तेशी लिंक केला नाही अशा मालमत्ताधारकांनी आपला मोबाईल नंबर लिंक करुन घ्यावा. ज्यांचा मोबाईल नंबर मालमत्तेशी लिंक झाला आहे, अशा मालमत्ताधारकांना मोबाईलवर महापालिका तर्फे मालमत्ता कराचे बील पाठविण्यात येत आहे.

सर्व मालमत्ता धारकांनी आपली देयके ऑनलाईन किंवा ऑफलाईन द्वारे प्राप्त करुन घेऊन मालमत्ता कराचा भरणा लवकरात लवकर करुन महापालिकेला सहकार्य करावे.
-डॉ. प्रशांत रसाळ, आयुवत-पनवेल महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भाजीपाला मार्केटमध्येही कडक उन्हाचा परिणाम