छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
शिवनेरी जुन्नर पेठ
शिवनेरी गडावर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी गेल्यावर एका शौर्याच्या समुद्ररूपी छत्रपतीच्या वारसदार असण्याचा महाराष्ट्र देशी जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो. टकमक टोकावरून पूर्वी गुन्हेगारांना शिक्षा म्हणून कडेलोट करत असत. गढी, काळ्या कातळावरील काही अवशेषात्मक गडाचा भाग काही नष्ट काही राखलेला भाग व भन्नाट वारा सर्व काही ऐतिहासिकच वाटते.
पुण्याहून, दीड तासाच्या अंतरावर असलेल्या जुन्नरला, मुंबईहून कल्याण माळशेज घाटातून तीन तासात मुंबईपासून १४५ किमीवर गाडीनेदेखील जाता येते. ठाण्याहून किमान कल्याणहून दर तासाला जुन्नरला बस आहे. नगर गाडीने गेल्यास, बनकर फाट्यावरून शेअर टेम्पो आहेत,बसेस आहेत. पुणे जिल्ह्यातील, मुंबई-माळशेज प्रसिद्ध रस्त्यावरून पुढे गेले, की जुन्नर येते. शिवनेरी जुन्नर पेठ! इथे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे, लाडके राजे, शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. ज्या छत्रपती श्री शिवाजी राजेंच्या उल्लेखावाचून जीवनच अपूर्ण राहील ,अशा शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शिवनेरी हे स्फूर्ती स्थान आहे.
१. शिवनेरी किल्ला - सभोवताली काळ्या कातळाचा खंदक, वरती टेकडीवर छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान व निळ्या आकाशाला, सर्वत्र हिरव्या वृक्षांची लाभलेली किनार आणि इतिहासाच्या संस्कृतीच्या त्या वारशाची सुवर्णमय झालर बघून ऊर अभिमानाने भरून येतो! लहानपणी वडील, दर सुट्टीत आम्हा मुलांना जुन्नरला घेऊन जायचे. सोन्याचा धूर निघणारी, शिवनेरी जुन्नर पेठ त्यांची अगदी लाडकी होती. सयाजीराव गायकवाड याकडे बडोद्यात शिक्षण झाले तरीही बालपणीच्या, तरुणपणाच्या त्यांच्या सर्व आठवणी त्यांना शिवरायांच्या जुन्नरमध्ये रेखलेल्या दिसत असत.
जुन्नरला गेल्यावर काय काय बघणार?
२. शिवनेरी जुन्नर पेठ - पूर्वीची बाजारपेठ म्हणून येथे अनेक मंदिरे आहेत. पांढऱ्या देव चापयाची झाडे सर्वत्र आढळतात. जुन्नर जवळ छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला आहे. (डोंगरावर). शिवनेरीला जाताना, वर चढण्या ऐवजी जर उजवी कडील वाटेनेच चढत गेला तर अंबालिका गुंफा आहेत. तिथे अजिंठा लेण्यातील चित्र व रंगकामाशी साधर्म्य दाखवणारी चित्रे आहेत. पाऊस पाणी झिरपून लेणी थोडी खराब झाली आहेत. पण अवर्णनीय आहे. पायऱ्या चढताना त्रास होऊ नये, म्हणून एक साखळी धरून वर चढण्याची सोय आहे.
शिवनेरी गडावर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी गेल्यावर एका शौर्याच्या समुद्ररूपी छत्रपतीच्या वारसदार असण्याचा महाराष्ट्र देशी जन्म घ्ोतल्याचा अभिमान वाटतो. टकमक टोकावरून पूर्वी गुन्हेगारांना शिक्षा म्हणून कडेलोट करत असत. गढी, काळ्या कातळावरील काही अवशेषात्मक गडाचा भाग काही नष्ट काही राखलेला भाग व भन्नाट वारा सर्व काही ऐतिहासिकच वाटते.
३) लेण्याद्रीचा गिरीजात्मक - पुष्पवंती नदीचे काठीवर, २८० पायऱ्या वर चढून गेल्यावर, अष्टविनायकातील एक असलेले लेण्याद्रीचे मंदिर आहे. जे हजारो वर्ष जुने असावे असा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. लेण्याद्रीचा मूर्तीच्या दोन्ही बाजूला नऊ नऊ, अशा अठरा खोल्या आहेत. नऊ रस व नऊ रसातील श्रेष्ठ असा वीर रस आणि शौर्याचा अधिपती छत्रपती शिवराय जुन्नरमध्येेच वावरले हार्इतिहास अतुल्य आहे. नऊ रंगातील श्रेष्ठ रंग म्हणजे केशरी रंग होय. या खोल्यांच्या मधील मुख्य सभागृहात अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत. ज्या पडझडीमुळे ओळखू येत नाहीत. विजयाचा केशरी इतिहास, शिवनेरी गड सांगतो.काळ्या कातळात, कोरलेल्या या मंदिराच्या उजव्या बाजूस स्तूप आहे. एकसंध शिळेतून कोरलेल्या या लेणी आहेत. बुद्ध कालीन या लेण्यांमधे त्या दिवशी अंधार होता. खोल्यांच्या बाहेर पाणी साठविण्याचे हौद आहेत. लेण्याद्रीला बाहेरून प्रदक्षिणा करण्याची सोय या मंदिरामध्ये आहे. भक्तांद्वारा गिरिजात्मकच्या पाठमोऱ्या मूर्तीचे मुख शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत.
४) वडजचा कुलस्वामी खंडोबा - शिवनेरीवरून खाली उतरताना वडजला जाणारा फाटा आहे. इथे कोपऱ्यावर नवीन बांधलेल्या आधुनिक प्रशस्त मंदिराचे दर्शन घेऊन, वडजला जायचे. त्या मंदिराच्या आवारात सामुदायिक विवाह सोहळा करण्यासाठी उत्तम सोय आहे. खंडोबाचा पितळी घोडा, सुंदर मूर्ती ,बोराच्या झाडाखाली छान मंदिरात आहे. लेण्याद्री डोंगरात, जशी सतरा अठरा कोरीव लिंग व ओवऱ्या आहेत..तशी अनेक लेणी या विभागातील डोंगरांमध्ये असावीत अशा तर्क आहे. हे देऊळसुद्धा कोरीव आहे व मराठा सरदारांचे कुलदैवत आहे. पाच पात्यांच्या मध्ये दिव्यांचे झुंबर असलेला,पुरातन पंखा मंदिरात आहे. खंडोबाची पालखी, भक्ती भाव जागवते. भंडारा उधळला जातो. कुकडी नदीच्या काठावर वसलेल्या या देवळात देवाच्या देवदर्शनाने विघ्न हरते.
वडजपासून ४ किमीवर पारुंडे गावी कुंभमेळा भरतो, तिथे जगातील ऐकमेव राक्षसमुखी काळभैरव मंदिर आहे, जवळ कालिका देवीचे मंदिर आहे.
५) ओझरचा विघेश्वर - जुन्नर पासून १० किमी वर ओझरचा विघ्नेश्वर आहे. हे मंदिर अष्टविनायकातील एक आहे. गणपतीची मूर्ती,देखणी असून विघ्नेश्वराचे बेंबीत हिरे आहेत. व शेंदूर लावलेली आहे. दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. सर्वत्र सुंदर रंगकाम केलेले आहे. मात्र काळ्या कातळातील खांब व मंदिर जसे इतिहासकालीन वाटायचे, तसे आता वाटत नाही. आवार प्रशस्त आहे. दोन उंच दीपमाळा आहेत. त्यावर त्रिपुरी पौर्णिमेला, दीपोत्सव करतात. पूव्रााभिमुख देवळाच्या ,चारी बाजूंना उत्तम स्थितीत असलेली तटबंदी आहे. महाद्वाराच्या दोन बाजूंना मोठ्या ओवऱ्या व तळघर आहेत.
६) पाताळेश्वर मंदिर - जमिनीखाली गुंफेत, शंकराची सुंदर पिंडी आहे. नाशिकच्या सीता-गुंफेची आठवण येते. आजूबाजूला सर्वत्र शेती पसरली होती. बांधावर भाव न मिळाल्याने टाकलेले टोमॅटो बघून वाईट वाटले ,एखाद्या सॉसच्या कंपनीने टोमॅटो विकत घेतले असते तर? "शेती पिकली, झाली पिवळी सोन्यावाणी” अशी शेती पिकुनही भाव न मिळाल्याने, शेतकरी राजा नाराज राहण्याची वेळ येते. पेरू, डाळिंब, फळे केली आंबे अशी फळझाडे व उसाची शेती, आजूबाजूला आढळते.
७) डोंगरावरची कातळ लेणी - ट्रेकिंग करून बघता येणारी ,अनेक लेणी,आढळतात इतिहासाचा वारसा या गावाच्या प्रत्येक कातळावर, खडकावर पसरला आहे.
शिवरायांच्या त्या शिवनेरी जुन्नर पेठहुन परत यायला निघाले तेव्हा मन खंतावले. वाटले, हिरकणीच्या सत्कार करणारे शिवराय पुन्हा होणे नाही. महिलांच्या अब्रूवर घाला घालणाऱ्याचे हात तोडणारे शिवबा पुन्हा होणे नाही, स्वतःचे हिंदवी स्वराज्य स्थापन करून मराठ्यांचा झेंडा रोवणारे छत्रपती, तत्व नीती सत्य यासाठी कशाचीही तमा न बाळगणारे आदर्श राजे शिवाजी राजे, पुन्हा होणे नाही!
आज श्रीमंत शिवाजी महाराज, स्मारक रूपानेच उरले आहेत का? शिवबा पुन्हा जन्म घ्या. या देशाला तुमची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!
तो जन्म शिवाजी राजेंचा जणू होता श्रीरामाचा
उखाडण्या पिसाट मोगलांना, गाडण्या अफाट पापाला
पुण्याईचा प्रताप दावण्याला, माणुसकी त्या जपण्याला
प्रेमाचा प्रकाश भरण्याला, शिवाजीराजे या पुन्हा जन्माला!
-शुभांगी पासेबंद