पुस्तक परिक्षण

 माध्यम भूषण हे देवेंद्र भुजबळ यांचे न्यू स्टोरी टुडे या प्रकाशन संस्थेतील सर्वेसर्वा यांच्या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या लेखनाचे हे संकलन आहे. हे पुस्तक ग्रंथालीतर्फे आले असून सौ अलका भुजबळ यांनी प्रकाशित केले आहे.

 मूल्य चारशे रुपये असून, पृष्ठे १७८ आहेत. माध्यम भूषण हे शीर्षक भूषणावह वाटते. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या, संचालक पदावर काम केलेले, जेष्ठ अधिकारी देवेंद्र भुजबळ यांचे हे माध्यम भूषण हे पुस्तक त्यांनी सादर केले आहे.

 सुरुवातीलाच अर्पण पत्रिकेत श्रीयुत भुजबळ सरांनी असं म्हणतात की  अतिशय निष्ठेने माध्यम धर्म पाळणाऱ्या सर्व माध्यम-कर्मींना हे पुस्तक अर्पण केल्याचे नमूद केले आहे.'

हे पुस्तक वाचनीय आहे. आयुष्यात अनेक विपरित परिस्थितींवर, संकटांवर मात करून पुढे गेलेल्या अंदाजे ३६ व्यक्तींबद्दलचे अल्प; पण प्रातिनिधिक परिचय या पुस्तकात आहेत. पुस्तकाला सुरुवात आदरणीय मधु मंगेश कर्णिक यांच्यापासून होते. आशयामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, वासंती वर्तक, किरण चित्रे, डॉ महेश केळुसकर, मेघना साने, वासंती वर्तक, स्मिता गव्हाणकर, डॉ सुलोचना गवांदे, प्राध्यापिका डॉक्टर सुचिता पाटील आणि अन्य अशा ३६ व्यवतीमत्वांबद्दलचे प्रेरक असे लेख आहेत. तरुणांना आजकाल आदर्श शोधणे अवघड झालेलं असताना या पुस्तकातील लेख वाचून तरुण प्रेरणा घेऊ शकतात.

 दिवसेंदिवस नोकरी अथवा व्यवसाय करणे दोन्ही अवघड असताना प्रतिकूल परिस्थितीने तरुणांवर परिणाम होतो. त्यावेळी हे लेख निश्चित प्रेरणा देतील. देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेली विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींबद्दल लिहिलेली ही सुबक व्यक्तिचित्र या पुस्तकात आहेत.

माध्यम भूषण
लेखक :  देवेंद्र भुजबळ  पृष्ठे : १७८
मूल्य : चारशे रुपये मुखपृष्ठ : हेमंत जोशी
-शुभांगी पासेबंद 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

या पाच गोष्टी तुम्हाला ब्रेन स्ट्रोकपासून वाचवतील