छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
अंधांची जीवन संजीवनी
‘पांढरी काठी' हा दिवस जगभरात दरवर्षी १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. डोळा असूनही नसल्यासारखा असतो. पांढरी काठी जणू अंधांसाठीचा डोळाच. कुणाच्याही आधाराशिवाय मुक्तपणे संचार करण्यासाठी पांढरी काठी म्हणजे जीवन संजीवनी आहे. अंध लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी यामूळे मदत होते. रस्त्यावरील खड्डे, चालण्यासाठीचे अडथळे, रस्त्यावरील चढ-उतार, रस्त्यावरील दगडधोंडे, खाजखळगे, कुत्रे मांजरे असे प्राणि बसलेले, झोपलेले माणसे, काठीच्या परिक्षेत येणारे सगळे अडथळ्यांची अंधांना अगदी चाणाक्षरित्या जाणिव होते, परिणामी घरातून बाहेर पडणाऱ्या अंध व्यक्तींना शाळा, कॉलेज, नोकरी व्य़वसायाच्या ठिकाणी, बाजार हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचणे सहजगत्या शक्य़ झाले आहे. म्हणजेच अंधांसाठी ‘पांढरी काठी' ही जीवनरेखाच होय.
अंध बांधवाना ‘संवेदना' हेच विशेष इंद्रिय परमेश्वराने बहाल केले आहे. अशा व्यक्तींना दिसत नाही, मात्र ते अतिशय सुक्ष्म़ आवाज, स्वऱ कानाने ऐकू शकतात. तिक्ष्ण़ घ्राणेंद्रियाने - नाकाने परिसराचा वास घेऊ शकतात आणि अचूकरित्या स्मरणातही ठेऊ शकतात. टाचणी वा सुई खाली पडली तरी त्यांना तिचा आवाज येऊ शकतो. त्वचा, नाक, कानाच्या सहाय्याने ते परिसराची माहिती देऊ शकतात. उदाहरणार्थ - रेल्वे गाडीचा वेग कमी झाला की पुढे स्टेशन येणार हे ते सहज ओळखतात. काठीच्या आधाराने रस्ता खडबडीत आहे की दलदल आहे हेही ते ओळखतात. एखाद्या वनस्पतींच्या रसायनाच्या विशिष्ट़ वासावरुन आपण याच परिसरात पुन्हा परत आलो आहोत हे ते सांगू शकतात. अंध मुले-मुली ‘सेंटर लेथ' मशीनवर या ॲल्युमिनीयम पाईपची निर्मीती करतात. मुंबई, पुणे, नाशिक, डेहराडून आदी ठिकाणी त्याचे कारखाने आहेत.
पांढऱ्या काठीने चालण्या वागण्यातली स्वयंपुर्णता अंध बांधवांना दिली; मात्र जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणेदेखील तितकेच महत्वाचे असते. यासाठीच १९९५ च्या अपंग कायद्यानुसार ज्याप्रमाणे शासकीय नोकऱ्यांमध्ये ०३ % आरक्षण जाहीर झाले आहे. अंध बांधवांनादेखील अश्या प्रकारे आरक्षण आहे. पांढऱ्या काठीच्या आधारावर जीवनाशी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या बांधवांना आज दया किंवा सहानुभूतीची नाही, तर संधीची गरज आहे. विविध क्षेत्रात अंध बांधव मोठ्या हिरिरीने कार्यरत आहेत. संगीत, निवेदन, साहित्य़, क्रीडा, औद्योगिक, शासकीय सेवा आदी क्षेत्रे आपल्या अभ्यासपूर्ण आणि कौशल्यतेने काबीज केली आहेत. उदाहरणार्थ निवेदन क्षेत्रात अनघा मोडक, औद्योगिक क्षेत्रात श्रीकांत बोल्ला, ब्रेली लिटरसी डिव्हाइस क्षेत्रातील अन्नी, संगीतकार रविंद्र जैन, देशातील पहिल्या अंध रेडीओ जॉकी डॉ.वृषाली शेख तसेच ब्रेल लेखनाचा शोधकर्ता आणि डिझायनर म्हणून लुई ब्रेल यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. आंतरराष्टीय क्रिकेटपटू शेखर नाईक, पॅरालंपिक धावपटू ऑस्क़र पिस्टोरिअस, मॅडीसन डी रोझारीयो यांचे नाव घेतले जाते.
‘पांढरी काठी' हा दिवस जगभरात दरवर्षी १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. हा दिवस दृष्टिहीन आणि अल्प़दृष्टी असलेल्या लोकांसाठी सुलभता, स्वावलंबन आणि समानतेचा संदेश देतो. या दिवशी पांढऱ्या काठीचे महत्व़ आणि ते वापरणाऱ्या व्यक्तींच्या स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणुन उत्स़व साजरा केला जातो. दृष्टिहीन व्यक्तींच्या गरजांविषयी समाजात जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना समाजात अधिक चांगल्या प्रकारे सामाऊन घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या दिनाचा मुख्य़ उद्देश आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुध्दानंतर डॉ.रिचर्ड हूवर यांनी सर्वप्रथम अंधांना चालण्या फिरण्यासाठी सोईचे होईल अशी विशिष्ट़ स्व़रुपाची काठी तयार केली. ती काठी हूवर केन म्हणुन ओळखली जाऊ लागली. सन १९२१ मध्ये ब्रिस्टल़चे फोटोग्राफर जेम्स़विन्स़ यांना अपघातात अंधंत्व़ आले, त्यावेळी गडद रंगांच्या काठ्या घेऊन फिरतांना अगदी डोळस व्यक्तींनाही कठीण जाते हे लक्षात आल्यानंतर अंधारातही सहजपणे दिसेल असा पांढरा रंग त्या काठीला दिला.
"आंधळ्याची काठी अडकली कवण्या भेटी” म्हणजे आंधळ्याची काठी कोणाच्या भेटीत अडकली आहे, हा संत जनाबाईंचा अभंग असून जो भक्ती आणि वि्ीलाच्या चरणी लीन होण्याची भावना व्यक्त़ करतो. कठीण प्रसंगात आंधळ्याची काठी जशी दिशाहीन होते त्याप्रमाणे वि्ीलाच्या अनुपस्थितीत स्व़तःची अवस्था सांगणे कठीण होते, असे या अभंगातून म्हटले आहे. अंधाऱ्या वाटेवर पांढरी काठी आधाराचा हाच खरा सोबती असून मुलतः पांढरी काठी आंधळ्याची नवी दृष्टी आणि स्वावलंबनाची पहिली पायरी तर आहेच; त्याचबरोबर आयुष्याचा अर्थ सांगणारी, आधाराची हमी देणारी, आत्म़विश्वासाची नवी दिशा, प्रगतीच्या कहाणीची रुजवात आणि आंधळ्याची स्वप्नांची भरारी होय. समाजाला अधिक संवेदक्षम, सहृदय होण्याचा एक प्रकारे संदेश पांढरी काठी देत असते.
डोळा हा अवयव शरीरात असूनही तो निकामी झालेल्या मंडळीसाठी पांढरी काठी म्हणजे त्यांना लाभलेले एक वरदानच ठरले आहे. अंध बांधवांचा खचलेला आत्म़विश्वास या पांढरी काठींनी वाढविला आहे. आतातर ती त्यांची आयुष्याची साथीदार झाली आहे. या अनुसरुन ६ ऑक्टोबर १९६४ रोजी हा दिवस पांढरी काठी सुरक्षा दिवस म्हणुन साजरा करण्याचा जगभरातल्या बहूतांश देशांनी निर्णय घेतला. बहूतेक देशांनी आपापले स्वतंत्र कायदे करुन पांढऱ्या काठीला अंधांची ओळख म्हणुन मान्यता दिली. - सौ.चित्रा विजय बाविस्कर