अटल सेतुचे लोकार्पण 

अटल सेतुचे लोकार्पण 

नवी मुंबई ः २४ डिसेंबर २०१६ रोजी शिवडी-न्हावा शेवा सी-लिंकच्या भूमीपुजन सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन केलेले ‘'देश बदलेगा भी और बढेगा भी' असे केलेले ववतव्य आज त्याच दिशेने चाललेल्या देशाच्या विकासात्मक वाटचालीच द्योतक आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. त्यामुळे आज पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज, आई मुंबादेवी आणि सिध्दीविनायकाचे नाव घ्ोऊन अटल सेतू देशाच्या सेवेसाठी लोकार्पित करत आहे. अटल सेतू मुंबई-नवी मुंबईसह देशासाठी मोठी उपलब्धी असून आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प नवनिर्माणाच्या दिशेने वाटचाल आहे. भारताच्या विकासाप्रती असलेल्या वचनबध्दतेचा पुरावा असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलवे येथे केले.
दरम्यान, कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात झालेल्या व्यत्ययांमुळे एमटीएचएल अटल सेतू वेळेवर पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक करुन म्हणाले की, कोणत्याही विकास प्रकल्पाचे उद्‌घाटन, समर्पण किंवा पायाभरणी छायाचित्रे नसून भारताच्या निर्मितीसाठी एक माध्यम आहे. अशा प्रत्येक प्रकल्पामुळे भव्य भारताच्या विकासात हातभार लागतो, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारी रोजी उलवे मधील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पस्थळी आयोजित सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास ३५ हजार कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण व्ोेÀले. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी हजाराेंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमदायाशी संवाद साधला. यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला बचत गटाच्या महिला सदस्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
या उद्‌घाटन झालेल्या विकास प्रकल्पांमध्ये रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी, पिण्याचे पाणी, रत्ने आणि दागिने तसेच महिला सक्षमीकरण या क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नवी मुंबई आणि मुंबईला जोडणाऱ्या जवळपास १८ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करुन बांधलेल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्‌घाटन केले. तसेच बहुप्रतिक्षीत खारकोपर-उरण रेल्वेचे लोकार्पण, दिघागांव रेल्वे स्थानकाचे उद्‌घाटन, ऑरेंज गेट ते मरी ड्राईव्ह येथील सागरी किनारा मार्गाचे भूमीपुजन, सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना टप्पा-१ चे लोकार्पण, नमो अभियान-मुख्यमंत्री महिला सशवतीकरण अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना निधी वाटप, नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र.१ अंतर्गत बेलापूर ते पंेधर मार्गाचे लोकार्पण या प्रकल्पांचा समावेश आहे. 
याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाश शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. दीपक व्ोÀसरकर, ना. मंगलप्रभात लोढा, ना. उदय सामंत, ना. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, खा. बारणे, आ. प्रशांत ठावूÀर, आ. बालदी, एमएमआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, आदि उपस्थित होते.
रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि पाणी आणि व्यवसायाशी संबंधित पायाभूत सुविधा या क्षेत्रातील प्रकल्पांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी यापैकी बहुतेक प्रकल्प राज्यात दुहेरी इंजिनचे सरकार असताना सुरु करण्यात आले होते. पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या टीमच्या प्रयत्नांचे त्यांनी यावेळी कौतुक केले. 
महिलांच्या उपस्थितीबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, मोदींनी दिलेली मुली आणि बहिणींच्या सक्षमीकरणाची हमी महाराष्ट्र सरकार पुढे नेत आहे. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान, नारी शक्तीदूत ॲप्लिकेशन आणि लेक लाडकी योजना यांसारख्या योजना त्या दिशेने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. महिलांनी पुढे येणे आणि विकसित भारतच्या चळवळीचे नेतृत्व करणे खूप महत्त्वाचे आहे. आमच्या आई आणि मुलींच्या मार्गातील प्रत्येक अडथळे दूर करणे आणि त्यांच्यासाठी जीवन सुलभ करणे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. उज्वला, आयुष्मान कार्ड, जन धन खाती, पीएम आवास अंतर्गत पक्की घरे, मातृ वंदना, २६ आठवड्यांची प्रसुती रजा आणि सुकन्या समृद्धी खाती यासारख्या योजनांची महिलांच्या गरजांबद्दलची चिंता स्पष्ट करीत महिला कल्याण कोणत्याही राज्यातील कोणत्याही दुहेरी इंजिन सरकारची सर्वात मोठी हमी आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
अटल सेतूचा आकार, प्रवास सुलभता, अभियंते आणि स्केल यामुळे प्रत्येकाला अभिमान वाटतो. या प्रकल्पात वापरलेले स्टील ४ हावडा पल आणि ६ स्टॅच्यु ऑफ लिबर्टी बांधण्यासाठी पुरेसे असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी जपान सरकारच्या मदतीबद्दल आभार मानले आणि पंतप्रधान शिंजो आबे यांचे स्मरण केले. आम्ही या पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प केला होता, याचीही पंतप्रधान मोदींनी आठवण करुन दिली. 
दरम्यान, आज भारत एकाच वेळी दोन आघाड्यांवर प्रगती करत असल्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. एकीकडे सरकार गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी मेगा कॅम्पेन राबवत आहे, तर दुसरीकडे देशाच्या प्रत्येक भागात मोठे प्रकल्प राबवले जात आहेत. अटल पेन्शन योजना आणि अटल सेतू, आयुष्मान भारत योजना आणि वंदे भारत-अमृत भारत ट्रेन, पीएम किसान सन्माननिधी आणि पीएम गतिशक्ती यांचा विरोधाभास करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उल्लेख केला.
तत्पूवार्ी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतातून देशातील सर्वात लांब अशा सागरी सेतूचे भूमीपुजन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्याबद्दल आनंद व्यवत व्ोÀला. राज्यातील प्रकल्प अर्थव्यवस्था बदलणारे आणि अर्थव्यवस्थेला मजबुती देणार आहे. या विकास प्रकल्पांमुळे आम्ही अबकी बार ४५ पार करणार, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.
तर आगामी २५ वर्षात नवी मुंबई, रायगड मधील प्रकल्प राज्यासह देशाला आर्थिक ताकद देणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. इकॉनॉमिकल हबच्या दृष्टीने या विभागाची वाटचाल सुरु असून एमएमआर रिजनमध्ये शासनाने रिंग रोडचे जाळे विणल्याचे ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या मनोगतातून राज्य शासनाच्या वाटचालीची माहिती दिली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

स्वच्छता अभियान लोकचळवळ बनावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे