नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
मराठी पाटी मनसे आंदोलनाची ठाण्यात ठिणगी
मनसे कार्यकर्त्यांनी एमजी हेक्टर चायना शोरूम बोर्डला काळे फासले
ठाणे : दुकानावर आणि आस्थापनेवर मराठी पाट्या लावण्याच्या मनसेच्या आंदोलनाने मुंबईत जोर धरला असतानाच रविवारी ठाण्यात मराठी पाट्याचा जागर करीत मनसेने थानायच्या घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरातील एमजी हेक्टर चायना शोरूम बोर्डला काळे फासून मराठी पाट्याच्या आंदोलनाची ठिणगी टाकली.
रविवारी घोडबंदर रोड मानपाडा येथे मनसे कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मानपाडा येथील एमजी हेक्टर चायना शोरूम बोर्डला काळे फासले. यावेळी माणसे कार्यकर्त्यांनी फुग्यांमध्ये काळी शाई भरून फुगे शोरूमच्या बोर्ड आणि प्रवेशद्वारावर भिरकावले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मात्र चायनीज शो रूमवर काळी शाई पोतुन निषेध नोंदविला. अन इशारा दिला कि, महाराष्ट्रात मराठी भाषेचा अवमान करू नये, महाराष्ट्रातील मराठ्यांशी खेळ करू नका. महाराष्ट्र सरकारने त्वरित महाराष्ट्रातील सर्व दुकानदार आणि आस्थापनाचे फलक हे मराठी करण्याचे निर्देश द्यावेत अन्यथा मनसे तीव्र आणि उग्र आंदोलन करेल, यात महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहील असे आव्हान मनसे कार्यकर्त्यांनी दिले.
ठाणे पालिकेच्या कुठल्याच हालचाली नाही
महाराष्ट्रात मराठी पाट्या बाबत मुंबई महापालिकेने हालचाली करीत मुंबईतील आपल्या आस्थापना आणि दुकानाच्या पाट्या मराठीत करण्याचे निर्देश दिले. मात्र ठाणे महानगर पालिकेत मात्र कुठल्याच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत दुकानदारांना पालिकेने निर्देश द्यावेत. ठाण्यातील दुकानाच्या पाट्या मराठीत लवकरात लवकर करण्यात याव्या अन्यथा मनसे स्टाईलने दुकानदारांना उत्तर दिले जाईल असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला.