दिवाळे गावातील ग्रामस्थांच्या शाळेचे होणार कायापालट

दिवाळे गावातील 70 वर्षाहून जुनी ग्रामस्थांच्या शाळेच्या पुनर्विकासासाठी  तब्बल रु. 10 कोटीचा निधी मंजूर...... आ.मंदा म्हात्रे  

नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे. तसेच नवी मुंबई शहर हे सर्व सुविधायुक्त म्हणून नावारूपास आहे. परंतु दिवाळे गावातील ग्रामस्थांची  शाळा ही गेली 70 वर्षेहून अधिक जुनी पूर्वीची असून ती मोडकळीस अवस्थेत आहे. या शाळेच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सर्व पालकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांना भेटून समस्या सांगितल्या आणि निवेदन दिले. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सदर शाळेला भेट दिली व नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या सोबत चर्चा करून सर्व सुविधायुक्त शाळा बांधण्यात येईल यासाठी प्रयन्त केले आहे व आज या शाळेसाठी आयुक्तांनी मंजुरी देऊन G+1 इमारत बांधण्याकरिता 10 कोटी इतका अपेक्षित खर्च येणार आहे. आज या ग्रामस्थांच्या शाळेचे लवकरात लवकर भूमिपूजन होईल अशी आशा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, प्राथमिक शाळा ही एक अशी व्यवस्था आहे जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंड ओळख होते. आजच्या काळात गावठाण विभागात प्राथमिक शाळेचे फार दैनीय अवस्था असल्याचे आपणास दिसून येत आहे तरी यांच्याकडे लक्ष देणे हे एक लोकप्रतिनिधीचे प्रथम कर्तव्य आहे आणि विकासात भर पाडणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, आपल्या जीवनात शिक्षणाला खूप अनन्य साधारण महत्व आहे.शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो व ग्रामीण विभागातील मुल-मुली हि शिकलीच पाहिजे. आज हे युग स्पर्धेचे आहे या स्पर्धेत  टिकण्यासाठी मुलांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेतले पाहिजे. या शिक्षणामुळे माणूस आपल्या जीवनात प्रगती करू शकतो. प्राथमिक शिक्षण हा तर मानवाच्या आयुष्यातला एक मुलभूत घटक आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक मुलांना मिळालेच पाहिजे या दुर्ष्टीकोनातून दिवाळे गावातील ग्रामस्थांच्या शाळेचे पुनर्विकास करून मुलांना चागंल्या दर्जाचे शिक्षण तसेच राहणीमान उंचावण्याकरिता उत्तम दर्जाची शाळा असणे गरजेचे आहे याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिवाळे गावातील  ग्रामस्थांच्या शाळेचे पुनर्विकासाकरिता रु. 10 कोटी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी वर्गाला सुंदर अशी एक सर्व सुविधायुक्त शाळा मिळणार आहे.

 त्यामुळे आमदार मंदाताई म्हात्रे यांचे दिवाळे गावातील न.मुं.म.पा. शाळा क्र. 2 च्या मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी यांनी आभार मानले व दिवाळे ग्रामस्थांनी अभिनंदन केले व नवी मुंबईमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक होत आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातून एसआरए योजना सुरु