नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
नवी मुंबई भाजपातर्फे संविधानदिन साजरा; स्वच्छता मोहिमेचे आयोजन
ज्येष्ठांना एनएमएमटी मोफत प्रवास पासाचे वितरण
नवी मुंबई : नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संविधान पंधरवडानिमित्त संविधानदिन साजरा करण्यात आला. स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. 26/11 मधील हल्ल्यात शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या 107 व्या भागाचे प्रक्षेपण करण्यात आले.
सीवूड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भाजपा प्रदेश पदाधिकारी वर्षा भोसले, माजी नगरसेवक विशाल डोळस, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश म्हात्रे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान पंधरवडानिमित्त नवी मुंबई भाजपाच्या वतीने बुथ स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आहे. संविधानाचा अभ्यास भारतातील सर्व नागरिकांनी करायला हवा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी यावेळी केले. संविधानामध्ये नमूद अधिकारांचा वापर करताना कर्तव्यांचे देखील पालन करायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार 2015 पासून देशात संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. हे संविधान तयार करण्यास अपार परिश्रम घेणारे घटना समितीचे प्रमुख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना मसुदा समितीचे अन्य सदस्य यांच्या प्रती देश सदैव कृतज्ञ राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 107व्या मन की बात भागाचे प्रक्षेपण करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नाईक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत हे प्रक्षेपण पाहिले. पंतप्रधान मोदी यांनी देशामध्ये सुरू केलेली स्वच्छतेची चळवळ देशात अमुलाग्र बदल घडवत आहे. वोकल लोकल फोर लोकल चळवळीमुळे स्वदेशी उत्पादनांना मागणी वाढल्याचे जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले.
लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार नवी मुंबई शहरातील 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटीच्या मोफत बस प्रवासाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी याबद्दल आमदार नाईक यांचे आभार मानले. तर अन्य शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले.
26 नोव्हेंबर 2008 रोजी अतिरेक्यांनी मुंबईवर केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी-कर्मचारी, सैनिक आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. स्वच्छतेसाठी अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पारितोषिके नवी मुंबई शहराला मिळालेली आहेत. स्वच्छता ही एक दिवस करण्याची गोष्ट नसून वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास स्वच्छता करायला हवी, असे मत जिल्हाध्यक्ष नाईक यांनी यावेळी मांडले.
या कार्यक्रम प्रसंगी कराटे आणि आर्चरी मधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नवी मुंबईमध्ये या दोन खेळांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी, यावेळी या खेळाडूंनी केली असता त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष नाईक यांनी दिली.
सीवूड सेक्टर 48 येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्याबाबतची मागणी जिल्हाध्यक्ष नाईक यांच्याकडे यावेळी करण्यात आली त्यावर सिडकोच्या माध्यमातून हा विषय सोडवू असे आश्वासन त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिले.
माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम राबविल्याची प्रतिक्रिया दिली.