मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिना निमित्त उरण शहर शाखेतर्फे अभिवादन
जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांची प्रमुख उपस्थिती
उरण : अखंड हिंदुस्तानचे हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे दैवत शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार दिनाकं १७ नोव्हेंबर २०२३ रोजी शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण शहर शाखेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
सदर वेळी शहरप्रमुख विनोद म्हात्रे,संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपशहरप्रमुख कैलास पाटील, गणेश पाटील, महिला उपजिल्हासंघटिका ममता पाटील, तालुका संघटिका(शहर) सुजाता गायकवाड, नगरसेविका वर्षा पाठारे, शहर संघटिका वीणा तलरेजा, शहर संघटिका मेघा मेस्त्री, संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, माजी तालुका संघटिका रंजना तांडेल, उपशहर संघटिका माधुरी चव्हाण, अल्पसंख्याक सेलच्या शहर अध्यक्ष मुमताज भाटकर, महिला शाखा संघटिका संगीता लोळगे, रजनी लोळगे, हसीमा सरदार, माजी नगरसेवक निलेश भोईर,जेष्ठ पत्रकार घनश्याम कडू, विभागप्रमुख गणेश शेलार, नंदू पाटील, संजय मेश्राम, सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.