दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरु करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

खा. राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

नवी मुंबई : शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शिवसेना शाखा तर्फे गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून तयार असलेले दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरु करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

 खासदार राजन विचारे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री आणि अखेर पंतप्रधानांकडेही नवी मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रवाशांसाठी औपचारिक उद्‌घाटन न करता सुरु केली त्याच धर्तीवर दिघा गाव रेल्वे स्थानक देखील विलंब न लावता तत्काळ सुरु करा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. परंतु, या पत्राची दखलही घेण्यात येत नसल्याने जनतेच्या हक्कासाठी ऐरोली आणि दिघा गाव रेल्वे स्थानकात शिवसेना नेते खासदार राजन विचारे तसेच शिवसेना नवी मुंबई जिल्हा शाखा तर्फे सह्यांची मोहीम २२ नोव्हेंबर रोजी राबविण्यात आली. या मोहीमेला नागरिक आणि प्रवाशी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उस्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, उपनेत्या ज्योती ठाकूर, संपर्क प्रमुख संतोष जाधव, विद्याधर चव्हाण, नवी मुंबई जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, संदीप पाटील, विजय देसाई, उपशहर प्रमुख श्रीकांत मोरे, जितेंद्र गवते, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, करण मढवी, सचिन पाटील, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले, अशोक सकपाळ, संदीप पवार, मंगेश साळवी, विजयानंद माने, प्रमोद कदम, मुकुंद ठाकूर, संजय तुरे आणि इतर शिवसेना पदाधिकारींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करुन दिघा गाव रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी बांधलेले आहे. परंतु, श्रेयासाठी दिघा गाव रेल्वे स्थानक उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत रखडवून ठेवलेले आहे,  असा आरोप यावेळी खासदार राजन विचारे यांनी केला. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवीन बांधकामांना परवानगी न देण्याची नामदेव भगत यांची मागणी