‘माथाडी युनियन'तर्फे चंद्रकांत पाटील यांचा सत्कार

राजकिय पक्षाची जबाबदारी आली तरी माथाडीना केंद्रबिंदू मानून कार्य करा - नरेंद्र पाटील

नवी मुंबई : राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे संयुक्त सरचिटणीस तथा माजी नगरसेवक चंद्रकांत रामदास पाटील यांची नियुवती केली आहे. याबद्दल ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'च्या वतीने चंद्रकांत पाटील यांंचा एपीएमसी मधील माथाडी भवन येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी ‘युनियन'चे नेते तथा ‘अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळ'चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ‘राष्ट्रवादी'चे पक्षप्रमुख आणि पक्षाचे आभार व्यक्त केले. तसेच चंद्रकांत पाटील यांना ‘राष्ट्रवादी'च्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदावर काम करीत असताना पदोपदी यश मिळो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

राजकिय पक्षाची जबाबदारी आली तरी कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'ला आणि माथाडी कामगारांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे. एकंदरीतच माथाडी कामगार संघटनाच्या व्यासपीठावरुनच पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळतात, असे नरेंद्र पाटील म्हणाले.
‘माथाडी युनियन'चे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना भाषणातून शुभेच्छा दिल्या.

तर माझे बंधु कै. ज्ञानेश्वर पाटील आणि कै. भोलानाथ पाटील यांच्यासह माझी ओळख कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या संघटना मुळे जास्त प्रमाणात झाली आहे. त्यामुळे संघटनेचे काम आणि माथाडी कामगारांना न्याय मिळवून देणे हेच माझेे पहिले ध्येय राहिल. ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'च्या वतीने केलेल्या सत्काराबद्दल चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यवत केली.

या सत्कार समारंभास 'माथाडी युनियन'चे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, दिलीप खोंड, कायदेशीर सल्लागार ॲड. भारती पाटील, खजिनदार गुंगा पाटील, माथाडी हॉस्पीटलच्या डॉ. राजश्री पाटील तसेच नवी मुंबईतील बाजारपेठा, ट्रान्सपोर्ट, आयर्न आणि इतर व्यवसायातील कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना  स्मृतिदिना निमित्त उरण शहर शाखेतर्फे अभिवादन