दशरथ भगत यांची कचरा वेचक भगिनींच्या वस्तीत दिवाळी साजरी

कुटुंबियांना दिवाळी फराळाचे, लहानग्यांना प्रदुषणमुक्त फटाक्यांचे वाटप

नवी मुंबई : नवी मुंबईला स्वच्छतेच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य शासनाचे अनेक पुरस्कार प्रापत झालेले असून, शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने सदर अभिमानाची बाब आहे. मात्र, या भूषणावह कार्यात नवी मुंबईतील विविध नोडस्‌ मध्ये महापालिका कर्मचाऱ्यांसह कचरा वेचणाऱ्या, कचऱ्याचे विलगीकरण करणाऱ्या हजारो गोरगरीब महिला भगिनींचे हात जोडलेले आहेत.  

या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे अध्यक्ष तथा नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नवी मुंबई शहर स्वच्छ राखण्यात बहुमूल्य योगदान म्हणून वाशी, सेक्टर-३० येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या अत्यंत अल्प उत्पन्न मिळविणाऱ्या कचरा वेचक भगिनींच्या वस्तीत जाऊन आगळ्या-वेगळ्या पध्दतीने दिवाळी साजरी केली. यावेळी दशरथ भगत यांनी कचरा वेचक महिलांच्या कुटुंबियांना दिवाळी फराळाचे आणि त्यांच्या लहानग्यांना प्रदुषणमुक्त फटाक्यांचे वाटप केले.

याप्रसंगी दशरथ भगत यांच्यासोबत ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे सहसचिव तथा प्रवक्ते शैलेश घाग, सामाजिक कार्यकर्ते हनेहल्ली, विमलअक्का इंगळे, आदि उपस्थित होते. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई मेट्रो प्रमाणे दिघा गांव रेल्वे स्थानक सुरु करा