‘भाजपा'ची विचारसरणीच मी नव्हे; तर आम्ही -लोकनेते रामशेठ ठाकूर

येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी तयारी करा - ना. रवींद्र चव्हाण

पनवेल : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भाजपा'ला मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे २०२४ मधील महाविजयाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे. येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढायची आहे या दृष्टीने तयारी करा, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी उलवे येथे केले.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये ‘भाजपा'ने घवघवीत यश संपादन केले आहे. त्या अनुषंगाने उत्तर रायगड मधील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार ‘उत्तर रायगड जिल्हा भाजप'च्या वतीने ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यावेळी ना. चव्हाण बोलत होते.

उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या सदर सोहळ्याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका मंडल अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे, खालापूर मंडल तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य अमित जाधव यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच, सदस्य आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांच्या कालावधीत विविध योजना, निर्णय, उपक्रम राबवून सर्वसामान्यांना जीवनात आधार दिला आहे. राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असल्यापासून विविध लोकोपयोगी कामे करुन जनतेचा विश्वास जिंकला आहे. रायगड जिल्ह्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना येणाऱ्या काळात पक्षाची ताकद आणखी वाढवायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने सक्रिय राहणे आवश्यक आहे, असे ना. रवींद्र चव्हाण म्हणाले.

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भाजपा'चा कायापालट केला. आज ते जगात सर्वांत लोकप्रिय नेते आहेत, तर भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस मोठे मन दाखवून कार्यरत आहेत. ‘भाजपा'ची विचारसरणीच मी नव्हे; तर आम्ही अशी आहे. म्हणून आपला पक्ष मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. अशाच प्रकारे एकजुटीने आणि नेटाने काम करीत राहिलो तर येणाऱ्या सर्व निवडणुका आपण जिंकू, असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यवत केला.

ग्रामपंचायत निवडणुकीत ‘भाजपा'ने बाजी मारली आहे. ना. रवींद्र चव्हाण यांच्यामुळे या स्थानिक निवडणुकीतही आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. ते आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नसले तरी पालक आहेत, असे सांगून ‘सबका साथ सबका विकास' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीने आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्रियाशील शैलीने पुढे वाटचाल करुया, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही विजयी सरपंच, सदस्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 दशरथ भगत यांची कचरा वेचक भगिनींच्या वस्तीत दिवाळी साजरी