पंतप्रधान यांना उद्‌घाटनासाठी वेळ मिळत नसल्यामुळे नवी मुंबईकरांची विनाकारण पिळवणूक

पंतप्रधानांमुळे ‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन लांबणीवर- खा. राजन विचारे यांचा आरोप 

नवी मुंबई ः मागील पाच महिन्यापूर्वी नवी मुंबई मेट्रो प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाली असताना, या प्रकल्पाचे राजकीय श्रेय लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्याचे उद्‌घाटन थांबवून ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्‌घाटनासाठी वेळ मिळत नसल्यामुळे नवी मुंबईकरांची विनाकारण पिळवणूक होत आहे. नागरिकांच्या सुख-सोयीपेक्षा यांना प्रकल्पाचे राजकीय श्रेय महत्त्वाचे आहे, अशी टीका शिवसेना नेते (उध्दव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी बेलापूर येथे केली. 

‘नवी मुंबई मेट्रो'चे उद्‌घाटन लांबणीवर टाकणाऱ्या सत्ताधांची पोलखोल करण्यासाठी ‘शिवसेना'च्या वतीने ३ नोव्हेंबर रोजी बेलापूर येथील मेट्रो रेल्वे स्टेशनजवळ स्वाक्षरी मोहीम घ्ोण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी ‘सीएमआरएस'चे प्रमाणपत्र मिळून पाच महिने लोटले आहेत. मात्र, मेट्रो सेवा अद्याप सुरु झालेली नाही. याचा निषेध करण्याठी शिवसेना नेते खा. राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ नोव्हेंबर रोजी ‘शिवसेना'च्या वतीने बेलापूर मध्ये आंदोलन छेडण्यात आले. 

या आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, द्वारकानाथ भोईर, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, माजी नगरसेवक एम. के. मढवी, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, दिलीप घोडेकर, संतोष घोसाळकर, अतुल कुळकर्णी, संदीप पाटील, शहरप्रमुख विजय माने, महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर, उपजिल्हासंघटक उषा रेनके, भारती कोळी, उपशहरप्रमुख समीर बागवान, प्रकाश चिकणे, महेश कोटीवाले, नरेश चाळके, संजय भोसले, सुजाता म्हात्रे, निखिल मांडवे, लक्ष्मण पाटील, आदि सहभागी झाले होते.
यावेळी नागरिकांनी ‘शिवसेना'च्या या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घ्ोऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान