रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१० ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

रायगड मध्ये ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

पनवेल ः रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१० ग्रामपंचायतींमधील १२४६ सदस्य पदांसाठी आणि १६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आज ५ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. दरम्यान, २१० सरपंच पदांपैकी ३८ पदे बिनविरोध तर १८५४ सदस्य पदांपैकी ५६४ सदस्य पदे बिनविरोध झाली आहेत.
रायगड जिल्ह्यात पनवेल तालुवयातील १७, उरण ३, कर्जत ७, अलिबाग १५, मुरुड १५, पेण ११, खालापूर २२, रोहा १२, सुधागड १३, माणगाव २६, तळा ६, महाड २१, पोलापूर २२, श्रीवर्धन ८ आणि म्हसळा १२ अशा २१० ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तर ९९ सदस्यपदांसाठी आणि १० सरपंचांच्या रिक्त पदांच्या ५ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकाही होणार आहेत. या निवडणुकीची उद्या ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) वि्ील इनामदार यांनी दिली.
१६ ते २० ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी, २५ ऑक्टोबर रोजी अर्ज माघारी अशी प्रक्रिया पार पडली आहे. आता आज ५ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होत आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतींमधील १८५४ सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. १८५४ जागांपैकी पनवेल, माणगाव, तळा, मुरुड, महाड, पोलादपूर श्रीवर्धन, म्हसळा येथील ४४ जागांवर एकही अर्ज दाखल झाला नाही. तर पनवेल १३, उरण २, कर्जत ४, खालापूर ४९, अलिबाग ५, मुरुड २४, पेण ३६, रोहा १६, सुधागड २३, माणगाव १२०, तळा ३८, महाड ७४, पोलादपूर ६८, श्रीवर्धन २९ आणि म्हसळा ६३ अशी एकूण ५६४ सदस्य पदे बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे आता पनवेल १६१, उरण ३९, कर्जत ६३, खालापूर १५३, अलिबाग १५२, मुरुड ११०, पेण ७, रोहा ९८, सुधागड ८८, माणगाव ९८, तळा ९, महाड ७०, पोलादपूर ९१, श्रीवर्धन २० आणि म्हसळा १९ अशा एकूण १२४६ सदस्य पदांची निवडणूक होत आहे.

थेट सरपंच पदांच्या २१० जागांपैकी महाड, पोलादपूर येथे प्रत्येकी एक आणि श्रीवर्धन येथे दोन अशा चार ठिकाणी एकही वैध अर्ज दाखल झालेला नाही. तर उमेदवारी अर्ज माघारीनंतर मुरुड, पेण, तळा, श्रीवर्धन येथे प्रत्येकी दोन, सुधागड येथे तीन, पोलादपूर, माणगावात प्रत्येकी पाच, महाडमध्ये आठ तर म्हसळा तालुक्यात नऊ अशी एकूण ३८ सरपंच पदे बिनविरोध झाली आहेत. त्यामुळे आता पनवेल १७, उरण ३, कर्जत ७, खालापूर २२, अलिबाग १५, मुरुड १३, पेण ९, रोहा १२, सुधागड १०, माणगाव २१, तळा ४, महाड १२, पोलादपूर १६, श्रीवर्धन ४ आणि म्हसळा ३ अशा एकूण १६८ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या अनधिकृत घरांची यादी वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्याची मागणी