राजमाता जिजाऊ  व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सव

नमुंमपा सीबीएसई शाळेत क्रीडामहोत्सव 

नवी मुंबई महानगरपालिका संचालित सीबीएसई शाळा क्रमांक 94 कोपरखैरणे येथे दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन मोठ्या दिमाखदार स्वरूपात झाले. प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सुधाकरजी सोनवणे उपस्थित होते. तर यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून लीलाधरजी नाईक माजी नगरसेवक, तसेच हनुमंत दळवी माजी परिवहन सभापती, नवी मुंबई शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी सुलभा बारघरे, कल्पना गोसावी, इंद्रप्रकाश पाल, शाळेचे मुख्याध्यापक मारुती गवळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र जाधव, शाळा व्यस्थापन समिती सदस्य व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत भारताच्या विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या विविध राज्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व युग पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून मशाल पेटवून ती विद्यार्थ्यांमार्फत शाळेच्या मैदानावर फिरवण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात स्वच्छता, रहदारीचे नियम ,स्वच्छ सर्वेक्षण, पर्यावरण जतन, माझी वसुंधरा, तंबाखूमुक्त शाळा इत्यादींबाबत उद्बोधनपर बोधवाक्य लिहिलेले फलक व फुगे देण्यात आले होते. या दिमाखदार सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आकाशात शालेय नाम फलक व फुगे सोडून वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले

यावेळी शाळेतील शिक्षक आशिष रंगारी, कविता वाडे, प्रमोद बामले यांनी तयार केलेले विशेष मास ड्रिल, एरोबिक्स, बॉल ड्रिल मोठ्या उत्साहात सादर करण्यात आले. यावेळी तायक्वांडो खेळाचे प्रात्यक्षिक रोहित सिनलकर  यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केले सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी क्रीडा शपथ शाळेची हेड गर्ल नीहीरा म्हात्रे हिने दिली. यावेळी परणीता म्हात्रे ,हसन मंसुरी, आदित्य ससाने यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे सुधाकरजी सोनवणे यांनी शाळेचे मुख्याध्यापक मारुती गवळी यांचे विशेष कौतुक करत म्हणाले की अत्यंत कमी शिक्षक वर्ग असताना देखील फार छानदार आयोजन त्यांनी केले आहे.  याच वेळी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या  शाळेला आवश्यक तेवढे शिक्षक न पुरवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसाना बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. लवकरात लवकर शाळेला आवश्यतेनुसार शिक्षकवृंद उपब्धतेसाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन देखील दिले.वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी, धावणे ,रिले, गोळा फेक, लांब उडी ,रिंगरेस  तसेच लहान मुलांसाठी विविध आकर्षक बौद्धिक खेळांचे देखील आयोजन या करण्यात आले आहे. या क्रीडा जल्लोषाचे शानदार स्वागत गीत आणि ईशस्तवन आरती बोरसे यांनी सादर केले . यावेळी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विनी शेलार, सारिका दळवी, सुजाता खराडे, अर्चीता जाधव, वनिता राजपकर, मीनाक्षी मोरे, वामन राठोड, प्रफुल पवार, विश्वास शिंदे तसेच शाळेचे स्वच्छता कर्मचारी व बहुउद्देशीय कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

सदर म्होत्सवात खो खो साठी राष्ट्रिय खेळाडू सुफियान शेख व संचितकंक यांनी तर कबड्डीसाठी. राष्ट्रीय खेळाडू श्रावण पडोती यानी पंच म्हणून काम पाहिले.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

नवी मुंबईत मल्लखांब स्पर्धा सीबीडी-बेलापूर येथे मल्लखांब स्पर्धा मोठ्या उत्साहात पार