रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉनचे आयोजित

22 जानेवारीला खारघर मॅरेथॉन; 'व्यसनमुक्तीसाठी' खारघर धावणार 

खारघर:  रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ता.22 जानेवारीला   'एक धाव व्यसनमुक्तीसाठी' हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन 'खारघर मॅरेथॉन 2023' हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

खारघर मधील सेक्टर 19 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून या स्पर्धेला सकाळी सहा  वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण सोहळाही त्याच ठिकाणी सकाळी नऊ वाजता होणार आहे. माजी खासदार  रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सेलिब्रिटींची मांदियाळी लाभणार आहे. 

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2006 साली पनवेल मॅरेथॉनच्या अनुषंगाने या स्पर्धेला प्रारंभ झाला. प्रथम आयोजनापासून ते आजपर्यंत उत्तम आणि नीटनेटक्या आयोजनामुळे हि स्पर्धा उत्तरोत्तर यशस्वी होत गेली. यापूर्वीच्या मॅरेथॉन स्पर्धा ‘रन अगेंस्ट एडस’, ‘पर्यावरणाच्या संरक्षणासाठी’, ‘एक धाव आरोग्यदायी पनवेलसाठी’, ‘रन फोर निर्भय भारत’, 'सदभावना दौड', ‘एक धाव पाणी बचतीसाठी’, ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधात एक धाव’, ‘एक धाव महिलांच्या सन्मानासाठी’, ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झक्शन’, ‘हम फिट तो इंडिया फिट’ अशी घोषवाक्य घेवून यशस्वीरित्या उत्कॄष्ठ आयोजनाने स्पर्धा पार पडल्या आहेत.

सामाजिक व शारिरीक हित जोपासले जात उत्कृष्ठ व सुयोग्य नियोजन आणि वेगवेगळया सामाजिक संदेशासाठी प्रसिध्द असलेल्या या स्पर्धेने लोकप्रियतेची शिखरे गाठली आहेत. यंदाची हि स्पर्धा 13 वी असून स्पर्धा पुरुष खुला गट 10 किलोमीटर अंतर, महिला खुला गट 10 किलोमीटर अंतर, 17 वर्षाखालील मुले आणि  मुली गट 5 किलोमीटर, 14 वर्षाखालील मुले आणि  मुली 5 किमी अंतर, तसेच खारघर दौड गट 3 किलोमीटर आणि सिनिअर सिटीझन दौड 2 किलोमीटर अशा आठ गटात हि स्पर्धा होणार असून दोन  लाख रुपयांची बक्षिसे आहेत. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक चषक  देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यातील पुरुष खुला गट व महिला खुला गटासाठी शंभर रुपये तर उर्वरित गटांसाठी वीस  रुपये नाममात्र`प्रवेश फी असणार तसेच शाळा व गृहसंकुल सोसायटींना खेळांमध्ये भाग घेण्यासाठी उत्तेजन देता यावे, यासाठी त्यांना प्रवेश शुल्कामध्ये पन्नास  टक्के सवलत देण्यात येणार आहे.  

 स्पर्धेत ‘सहभाग घेण्याची अंतिम तारिख 15 जानेवारी  सायंकाळी पाच  वाजेपर्यंत असून चेस्ट नंबर 18 जानेवारी सायंकाळी 5  वाजेपर्यंत स्पर्धकांनी घेऊन जाणे अनिवार्य आहे. स्पर्धेची नाव नोंदणी संकेतस्थळ (www.khargharmarathon.in), 7757000000 या क्रमांकावर मिस्ड कॉल आदी ऑनलाईन पद्धतीने करता येणार असून अधिक माहितीसाठी  02227744410/577 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि या स्पर्धेचा जास्तीत जास्त स्पर्धक, क्रीडारसिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्पर्धा प्रमुख व महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

राजमाता जिजाऊ  व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस चालणाऱ्या क्रीडा महोत्सव