हळदीकुंकू समारंभात महिला सुरक्षा विषयी पोलिसांचा संवाद

सानपाडा : मकरसंक्रातीपासून हळदीकुंकू कार्यक्रमांचे विविध संस्था, लोकप्रतिनिधी अथवा पक्षांच्या माध्यमातून आयोजन केले जाते. त्यानुसार माजी नगरसेविका फशीबाई करसन भगत, वैजयंती दशरथ भगत आणि रुपाली निशांत भगत यांनी जुईनगर, सानपाडा-पामबीच आणि वाशीगांव या प्रभागांमध्ये २४ ते २६ जानेवारी या तिन्ही दिवशी हळदीकुंकू कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 

हळदीकुंकू कार्यक्रमात केवळ हळदीकुंकू अथवा वाण एवढेच नियोजन न करता याच कार्यक्रमातून उपस्थित महिलांना नवी मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकातील महिला अधिकारी सविता मोहिते यांनी महिलांच्या बाबतीत होणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, मोबाईलशी संबंधित कॉल आणि इतर गैरवापर याबाबतीत घडलेल्या घटनांच्या उदाहरणासह सावधानता कशी बाळगावी याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कार्यक्रमात उपस्थित महिलांशी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी थेट संवादही साधला.

सदर कार्यक्रमात निवेदक राजेश तांबडे आणि दामिनी नलावडे यांच्या वतीने विविध खेळांचे मनोरंजनपर आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिन्ही प्रभागातील महिला कार्यकर्त्या आणि महिला बचत गटांचे विशेष सहकार्य लाभले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आपली मराठी भाषा अभिजातच - प्रा. प्रवीण दवणे