‘क्रेडाई-बीएएनएम'चे प्रॉपर्टी प्रदर्शन सुरु

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नगरीत आपल्या घराची स्वप्नपूर्ती करण्यासाठी नवी मुंबईतील सीवुडस्‌, पामबीच रोड जवळील गणपतशेठ तांडेल मैदानात २३ वे मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन सुरु झाले आहे. या प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्‌घाटन वनमंत्री ना. गणेश नाईक आणि आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत २४ जानेवारी रोजी संपन्न झाले. याप्रसंगी अभिनेत्री यामी गौतम, नमुंमपा नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण, ‘क्रेडाई-बीएएनएम'चे अध्यक्ष वसंत भद्रा, सचिव जिगर त्रिवेदी, देवांग त्रिवेदी, भूपेंद्र शहा, विकी थॉमस, कोषाध्यक्ष करण सबलोक, शैलेश पटेल (संयोजक), प्रवीण पटेल, हितेश गामी, महेश पटेल, झुबिन संघोई (सह-संयोजक) आणि पॅराडाईज ग्रुपचे मधू भतिजा, मनिष भतिजा, आदि उपस्थित होते.

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांच्या ‘बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बीएएनएम)' आणि क्रेडाई बीएएनएम, रायगड यांच्या वतीने यंदाही आपल्या स्वप्नातील घर घेणाऱ्यांसाठी आणि प्रॉपर्टी गुंतूवणुकदारांसाठी भव्य ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'चे आयोजन करण्यात आले असून सदर प्रदर्शन २७ जानेवारी या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सर्वासाठी खुले आहे. या मेगाप्रॉपर्टी प्रदर्शनातून कनेक्टिंग नवी मुंबई आणि विमानतळाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. खारघर, नेरळ, खोपोली, कर्जत, रोहिंजण, तळोजा, पुष्पकनगर, द्रोणागिरी, उरण, उलवे, पामबीच, नेरुळ, एनआरआय, सानपाडा, घणसोली, ऐरोली आदि ठिकाणी महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्प निर्माण करत असलेले शेकडो बिल्डर्स प्रॉपर्टी प्रदर्शनात सहभागी झाले असून त्यांचे जवळपास ३०० हुन अधिक प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

नवी मुंबई आणि रायगड झपाट्याने विकसित होत आहे. नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, कोस्टल रोड, पनवेल-बदलापूर टनेल, वडोदरा-जेएनपीटी हायवे प्रोजेक्ट, खारघर-तुर्भे लिंक रोड, ऐरोली-कटाई नाका प्रÀी-वे, चिरनेर ते चौक रोड प्रोजेक्ट, तळोजा-बेलापूर कोस्टल रोड, टीपीएस आणि नैना प्रोजेक्ट, नवीन खोपोली इंडस्ट्रीअल बेल्ट, ऐरोली नॉलेज पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर खारघर, नेरुळ सायन्स पार्क, वाशी डेपो स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स, मेरिटाईम युनिव्हर्सिटी, खारघर गोल्फ कोर्स आदि महत्वाकांक्षी प्रकल्प नवी मुंबई आणि रायगड परिसरात निर्माण झाले असून काही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे येथे आपल्या स्वप्नातील घर घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रॉपर्टी प्रदर्शनात १५ लाखापासून ते २५ कोटी रुपये किंमत असलेली घरे आणि पलॅट उपलब्ध असून घरांची बुकींग करणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ असल्याचे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी सांगितले.

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या वतीने इमारत पुनर्विकास जनजागृतीकरिता प्रॉपर्टी प्रदर्शनस्थळी स्टॉल लावण्यात आला आहे. नागरिक आणि विकासक यांच्यामध्ये इमारतीचा पुनर्विकास करण्यासंदर्भात असलेल्या तरतुदींबाबत जनजागृती करण्यासाठी सदर स्टॉल लावण्यात आला आहे. बांधकाम प्रकल्पांमध्ये प्रदुषण कमी करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मानक प्रणाली अवलंबिण्यासाठी या स्टॉलच्या माध्यमातून माहिती दिली जात असल्याचे महापालिकेचे सहाय्यक संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळे बेटावर प्रथमच फडकणार राष्ट्रध्वज