नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
‘रिकामा तास, शिक्षण खास' या नवोपक्रमास दुसरा क्रमांक
नवी मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रच्या वतीने घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल, वाशी येथील उपशिक्षक तुषार चंद्रकांत म्हात्रे यांच्या ‘रिकामा तास, शिक्षण खास' या नवोपक्रमास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रच्या वतीने राज्यभरातील उपक्रमशील शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाची या उपक्रमाची या स्पर्धेंची पहिली ऑनलाईन फेरी संपन्न झाल्यानंतर ‘जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रहाटोली-अंबरनाथ येथे १० जानेवारी रोजी सादरीकरण संपन्न झाले. सदर स्पर्धेचा ठाणे जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल, वाशी येथील तुषार चंद्रकांत म्हात्रे यांच्या ‘रिकामा तास, शिक्षण खास' या नवोपक्रमास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. यासह हा नवोपक्रम पुढील मूल्यांकनासाठी राज्यस्तरावर पाठवण्यात आला आहे. तुषार म्हात्रे हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी शिक्षकांच्या गैरहजेरीत घेतल्या जाणाऱ्या ‘ऑफ पिरियड'चा वेळ सत्कारणी लागावा यासाठी सर्वेक्षणात्मक संशोधन केले. या संशोधनाच्या आधारे या तासिकांना कृतीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांना यापूर्वीही विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आहेत. विद्यालयाच्या प्राचार्या सुमित्रा भोसले वं त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हात्रे यांचे अभिनंदन केले आहे.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    