रक्तदानाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन

डोंबिवली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ब्लड फॉर बाबासाहेब या जागतिक अभियान अंतर्गत गरजवंत रक्तदात्यांसाठी रक्तदान करुन महामानवाला आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्था डोंबिवली यांनी केले. यासाठी विशेष सहकार्य चिदानंद चारिटेबल ट्रस्ट शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवली यांचे मिळाले.

यावेळी महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये सुमारे ३० रक्तदात्यानी रक्तदान करुन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. त्याचप्रमाणे रक्तदान करणाऱ्या रवतदात्यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदान कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र ठोके, उपाध्यक्ष सरला खरात, खजिनदार निलेश कांबळे, कार्याध्यक्ष रविकिरण मस्के, संघटक विजय इंगोले, संघटक सूर्यकांत पारधे, राजू काकडे, अर्जुन केदार, बाजीराव माने नंदू पाईकराव, विनोद पठाडे राज गौतम, अमोल मोरे, महेश वाघमारे, धम्मपाल पाईकराव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्था माध्यमातून करण्यात आल्याचे अध्यक्ष सुरेंद्र ठोके यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांचे वैचारिक अभिवादन