नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
भिवंडी महापालिका कर्मचाऱ्यांसाठी प्राण कार्ड
भिवंडी : केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निर्देशानुसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना नुसार नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कायम निवृत्ती लेखा क्रमांक (प्राण) कार्ड घेणे आवश्यक आहे. या प्राण कार्डाचे अनेक आर्थिक फायदे आहेत. प्राण कार्ड सर्व कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. असा उपक्रम सुरु करणारी राज्यातील भिवंडी पहिली महापालिका ठरली आहे, असे महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी सांगितले.
१ नोव्हेबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्ती योजना मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत एकूण ७३४ शिक्षक कार्यरत असून त्यापैकी ४८५ शिक्षक १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत. अशा सर्व शिक्षकांचे एनपीएस योजना अंतर्गत प्राण कार्ड काढण्याचे काम सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. प्राण कार्ड काढण्यासाठी लवकरच शाळामध्ये ऑनलाईन नोंदणी शिबिर सुरु करण्यात येत असून सर्व शिक्षकांनी त्यांची नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.
याप्रसंगी उपायुवत (मुख्यालय) रोहिदास गोरकुलकर, उपायुक्त (शिक्षण) अनुराधा बाबर, सहा. आयुक्त (शिक्षण) प्रकाश राठोड, प्रशासन अधिकारी बाळाराम जाधव, कार्यालयीन अधीक्षक स्वाती संखे, लिपीक राजेंद्र कोंडावार तसेच अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दरम्यान, सदर योजनेचा फायदा १ नोव्हेबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपापले प्राण कार्ड बनविण्यासाठी संबंधित शाळेमध्ये जावून ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.
केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निर्देशानुसार एनपीएस योजना राबवणारी भिवंडी महापालिका महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे. त्याच धर्तीवर आता महापालिका शिक्षकांनाही सदर योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. सदर योजनेमुळे भिवंडी महापालिकेतील प्राथमिक शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सर्व शिक्षक कर्मचारी तसेच भिवंडी शिक्षक कृती समिती तर्फे आयुवत अजय वैद्य, अतिरिवत आयुक्त वि्ल डाके, उपायुक्त (शिक्षण) डॉ. अनुराधा बाबर तसेच सहाय्यक आयुक्त (शिक्षण) प्रकाश राठोड यांचे आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सहाय्यक आयुवत प्रकाश राठोड यांनी शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली एनपीएस योजना पाठपुरावा करुन केवळ २ महिन्यांमध्ये पूर्ण केली, त्याबद्दल शिक्षकांकडून त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    