नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
ठाणेमध्ये विभागनिहाय २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद
ठाणे : मुंबई महापालिका कडून ठाणे महापालिकेला मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. तसेच दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्याने ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यातही घट झाली आहे. अशा एकूण सुमारे ३० टक्के पाणी कपातीमुळे आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचे नियोजन करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका तर्फे पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम'मध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम १ डिसेंबर पासून सुरु झाले असून या तातडीची तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे ५ डिसेंबर पर्यंत पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. सदर दुरुस्ती आणि भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण ३० टक्के पाणी कपातीचा ठाणे महापालिकेला सामना करावा लागत आहे.
या परिस्थितीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात दररोज ३० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये, यासाठी विभागवार सकाळी ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ या वेळेत एकेका विभागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी दुरुस्तीच्या या काळात तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारे विभागः
३ डिसेंबरः माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुणवाल, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली.
४ डिसेंबरः गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपूरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिध्दांचल, कोंकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्रीनगर १-२, मैत्री पार्क.
५ डिसेंबरः सिध्देश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोवुÀळ नगर, आझाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर.
६ डिसेंबरः दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर.
७ डिसेंबरः राबोडी १-२, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरी मरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनिषा नगर, आतकोणेश्वर नगर, भास्कर नगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर.
८ डिसेंबरः लोकमान्य पाडा नं.१, २, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजीनगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण सोसायटी, घंटाळी, राम मारुती रोड. 
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    