रा.फ.नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली एड्‌सविरोधी जागृती

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण संस्थेच्या एफ.जी. नाईक महाविद्यालयात २ डिसेंबर रोजी जागतिक एड्‌स जनजागृती दिन साजरा करण्यात आला. या दिनाची औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या माध्यमातून पोस्टर मेकिंग आणि जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिल्हा एड्‌स नियंत्रण विभाग ठाणे संस्थे अंतर्गत ICTC नागरी आरोग्य केंद्र ICTC कोपरखैरणे येथील सौ. रमा शिंदे (समुपदेशक),जब्बार शेख (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविक पर भाषणात प्राचार्य महाडिक यांनी  देशातील एकूणच एड्‌स रुग्णाची टक्केवारी नमूद केली व त्यानुसार सद्यस्थितीमध्ये एड्‌सचे प्रमाण  वाढत आहे असल्याचे पाहायला मिळत असून यासाठी एड्‌स जागृतीपर कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे असल्याचे सांगत समाजामध्ये एड्‌सबद्दल असलेले अज्ञान दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती व्यापक स्वरुपात करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रॅली सहभागी झाल्याबद्दल प्राचार्यांनी त्यांचे कौतुक केले. सौ. रमा शिंदे यांनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आपल्या जीवनात आरोग्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थी हा आजच्या समाज जीवनाचा महत्त्वाचा घटक असल्याने विद्यार्थ्यांनी जबाबदारी घेऊन समाजामध्ये एड्‌स सारख्या रोगाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन करीत निरोगी समाज घडविणे गरजेचे असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील पोस्टर मेकिंग स्पर्धेत यामध्ये एकूण २५ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शाविला. यात  प्रथम क्रमांक सानिया मयेकर एफ. वाय. बी.कॉम, द्वितीय क्रमांक निर्जला गुप्ता टी. वाय. बी. कॉम तसेच तृतीय क्रमांक ओमकार देशमुख एफ.वाय. बी.कॉम. यांनी मिळवला.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. दत्तात्रय घोडके, राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे प्रमुख प्राध्यापक प्रमोद साळुंखे तसेच प्रा. डॉ. कविता पवार, एन.एस.एस कमिटी मेंबर प्रा. चिन्मय वैद्य व प्रा. प्राजक्ता सावंत आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रस्ता अपघातास आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांद्वारे जनजागृती; दंडात्मक कारवाई