एड्‌सविरोधी जनजागृतीसाठी सरसावले महाविद्यालयीन तरुण तरूणी

नवी मुंबई : एमजीएम मेडिकल कॉलेज, नेरुळच्या सामुदायिक औषध विभागातर्फे जागतिक एड्‌स दिनाचे औचित्य साधून ३० नोव्हेंबर रोजी जागतिक एड्‌स दिनानिमित्त मेळावा व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत ५० विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.संध्या खडसे आणि सामुदायिक औषध विभागाचे विभागप्रमुख डॉ. विश्वजीत एम. चव्हाण हे प्रमुख उपस्थित होते.

सकाळी १०.३० वाजता डॉ. संध्या खडसे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर रॅलीला प्रारंभ करण्यात आला.  केला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत रस्त्यावर एड्‌सविषयक जनजागृती करणाऱ्या घोषणा देऊन आणि स्वतः तयार केलेल्या आकर्षक फलकांद्वारे संदेश पोहचवला. ही रॅली महाविद्यालयातून सुरू होऊन नेरुळ रेल्वे स्थानक पश्चिमेकडे पोहोचली. रेल्वे स्थानक परिसरातील लोकवस्ती लक्षात घेता, तेथील मोठ्या जनसमुदायाला एड्‌सविषयी माहिती देण्यासाठी रॅलीने थोडा वेळ थांबून जागरूकता मोहीम राबवली. यानंतर रॅली महाविद्यालयाकडे परत निघाली. डॉ. खडसे यांनी विद्यार्थ्यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि अशा उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा दिली. जागतिक एड्‌स दिनाच्या निमित्ताने समाजात एड्‌सविषयी जागरूकता वाढवण्याच्या या प्रयत्नांना सर्व स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळाला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका उत्पन्न वाढीसाठी टास्क फोर्स