जीटीआय बंदर मधील ऑपरेटर्सना तब्बल १९ हजार रुपये पगारवाढ!

उरण : उरण  तालुक्यातील जेएनपीटी मधील एक महत्वाचे बंदर म्हणजे GTI (APMT) या बंदरामध्ये काम करणारे आरटीजीसी RTGC ऑपरेटर्स कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम ॲन्ड जनरल कामगार संघटना तसेच माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखालील शिवतेज संघटना या संघटनांचे सभासद आहेत. या कामगारांचा पगारवाढीचा करार बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित होता. सदर दोन्ही कामगार संघटनाच्या नेत्यांनी संयुक्तिक चर्चा करुन २७ नोव्हेंबर रोजी जीटीआय बंदर मधील ऑपरेटर्सच्या पगारवाढीचा करार केला.

या पगारवाढीच्या करारनाम्यानुसार प्रत्येक कामगाराला तीन वर्षासाठी १९,००० रुपये पगारवाढ, इंसेन्टीव्हमध्ये ५० टक्के वाढ, एक ग्रॉस पगार ङ्ख २१,००० रुपये बोनस, आई -वडिलांसहीत ३ लाख ५० हजार रुपयांची मेडीक्लेम पॉलीसी , फेस्टिवल ॲडव्हान्स ३० हजार रुपये, लाईफ इन्शुरन्स ३० लाख, निवृत्ती वय ५८ ऐवजी ६० वर्ष, ८ महिन्याच्या वाढीव पगाराचा फरक देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

या करारनामा प्रसंगी ‘न्यु मॅरीटाईम ॲन्ड जनरल कामगार संघटना'चे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रमण, ‘शिवतेज संघटना'चे अध्यक्ष माजी आमदार मनोहर भोईर, ‘पयुचर्झ स्टाफिंग सोलुशन'चे डायरेक्टर चिराग जागड, एच.आर. मॅनेजर हृदयनाथ कांबळे, कामगार प्रतिनिधी आदिनाथ भोईर, मंगेश पाटील, सुरेश पाटील, विक्रांत ठाकूर, सुदिन चिखलेकर, भालचंद्र म्हात्रे, अरुण कोळी, भूपेंद्र भोईर, अशोक म्हात्रे, निलेश पाटील, तुषार घरत, दर्शन घरत आदी उपस्थित होते.

पगारवाढीच्या करारनाम्यामुळे जीटीआय बंदरामधील कामगारांचे पगार एक लाख रुपयांच्या वर गेलेले आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घरांच्या किंमती जाहीर न केल्याने ग्राहक संभ्रमात