सीएनजी दरात वाढ झाल्याने रिक्षा मीटरमध्ये वाढ मिळण्याची मागणी

नवी मुंबई : सीएनजी दरामध्ये वाढ झाल्याने रिक्षा मीटरमध्ये वाढ करण्याची लेखी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी गजानन गावडे यांच्याकडे केली आहे.

रविंद्र सावंत यांनी सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी गजानन तावडे यांची रिक्षाचालकांसमवेत तसेच रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन रिक्षा व्यवसायातील अडचणी कथन केल्या. यावेळी रविंद्र सावंत यांच्यासमवेत युनिट अध्यक्ष विवेक पवार, संदीप बागडे, राजू कदम, गणेश शिंदे, वामन रंगारी ,विनोद मालुसरे,देसाई बुवा, शिष्टमंडळात सहभागी झाले होते.

दोनच दिवसापूर्वीच्या सीनजीच्या दरात किलोमागे वाढ झाली असून आज पेट्रोलपंपावर गॅस ७७ रुपये किलो या दराने विकला जात आहे. सध्या महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढत्या किंमतीने वाहन मालक त्रस्त झाले आहेत. सीनजी गॅसची किंमत वाढल्याने त्याचा सर्वात मोठा फडका गोरगरीब रिक्षाचालकांना बसला आहे. आधीच रिक्षाव्यवसायात मंदी असल्याने कुटूंबाचा खर्च चालविण्याइतपतही व्यवसाय होत नाही. त्यातच रस्ते खराब असल्याने रिक्षा नादुरुस्त पडण्याचे व चालक आजारी पडण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. सीएनजी दर वाढले असले तरी रिक्षाचालकांना आहे त्याच मीटर दरात व्यवसाय करावा लागत असल्याने रिक्षा चालकांचे नुकसान होऊ लागले आहे. ङ्गकोरोना काळापासून रिक्षा व्यवसायात मंदी आहे. त्यातच रिक्षा घेण्यासाठी काढलेले पतसंस्थांचे कर्ज, घरांचे भाडे, मुलांचे शिक्षण, घरखर्च आदीची सांगड घालणे रिक्षाचालकांना अवघड जात आहे. त्यातच  प्रवाशांना सेवा कमी दरात व सीएनजी वाढते दर यामुळे रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचे मीटर २३ रुपयांऐवजी २६ रुपये करण्यात यावे की जेणेकरुन रिक्षाचालकांना व्यवसायात होणारा आर्थिक तोटा भरुन निघेल. गॅसचा खर्च, रिक्षा दुरुस्तीचा खर्च यामुळे आधीच रिक्षा व्यवसायाचे अस्तित्व संकटात सापडले आहे. सीनजीच्या सतत वाढत्या किंमती पाहून आपण नवी मुंबईतील रिक्षांचे सुरुवातीचे मीटर २६ रुपये करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.

रिक्षा चालकांना बाटला पासिंग ७०० रुपये नियमाप्रमाणे असतानाही खासगी एजंन्सी रिक्षा चालकांकडून २७०० ते ३००० रुपये आकारले जातात, याकडे रविंद्र सावंत यांनी लक्ष वेधले असता, त्यांनी सीएनजी बाटला पासिंग रिक्षा एजंन्सीवर स्कॅवाड धाड टाकेल, असे आश्वासन सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी गजानन गावडे यांनी दिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शेल्टर असोसिएट्‌स तर्फे भीमनगर येथे जागतिक शौचालय दिन साजरा