नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
‘रक्तदान'द्वारे २६/११ हल्ल्यातील शहीदांना ६० पेक्षा अधिक रक्तदात्यांचे स्वेच्छेने रक्तदान
नवी मुंबई : २६/११/२००८ रोजी मुंबई शहरात झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नागरीक, पोलीस आणि जवानांना मानवंदना, श्रध्दांजली अर्पण करण्याकरीता ‘वाहन चालक-मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था, नवी मुंबई' या सेवाभानी संस्था तर्फे ‘रक्तदान शिबीर' आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ६० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करुन आपली दैवी जबाबदारी पार पाडतानाच रक्तदानाद्वारे २६/११ हल्ल्यातील शहीदांंना आगळी-वेगळी श्रध्दांजली अर्पण केली.
रक्तदान शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी सर्व नागरिकांना, आयोजकांना मार्गदर्शन करुन रक्तदान आणि रस्ता सुरक्षा संदर्भात प्रेरित केले.
‘वाहन चालक-मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था'चे अध्यक्ष राजेश भोईर, उपाध्यक्ष किरण ढवळे, उपाध्यक्ष अमरदिप सिंग, सचिव धनंजय पाटील, प्रमुख सल्लागार इंद्रजित सिंग, सदस्य तुषार रावराणे, प्रमोद तनपुरे, बलविंदर सिंग, किरण मानगावकर, प्रेम रुपानी, तरुण मस्तान, बलदेव सिंग, शंकर शास्त्री यांच्यासह नियमित रक्तदाते, सर्व संस्था प्रतिनिधी यांनी मोलाचे सहकार्य करुन जनजागृती करत रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पाडले.
रक्तदान शिबिरात सानपाडा मधील सामाजिक कार्यकर्ते तथा नियमीत रक्तदाते निलेश सोमाजी कचरे (४५ वेळा रक्तदान) यांनी रक्तदानाचे फायदे समजावत नागरिकांना रवतदानासाठी प्रेरित केले तसेच रक्तदानाचे महत्व पटवून देत नव रक्तदात्यांना प्रोत्साहित केले.
सदर रक्तदान शिबिरास नवी मुंबई परिवहन कार्यालय आणि नवी मुंबई महापालिका मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांनी मोलाचे सहकार्य केले.
रवतदान शिबिरात उपस्थित सर्व संस्था सभासदांचे, सर्व प्रतिनिधींचे, सर्व शासकीय यंत्रणांचे आणि सर्व रक्तदात्यांचे आभार ‘संस्था'चे अध्यक्ष राजेश भोईर यांनी मानले.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    