खारघर मध्ये सोनेरी कोल्हे

खारघर : खारघर मधील पाणथळ भागात सोनेरी कोल्हे वावरत असल्याचे निदर्शनास येताच पक्षी निरीक्षक प्रदीप चौधरी यांनी तब्बल ३ सोनेरी कोल्ह्यांना कॅमेऱ्यात टिपले आहे.

खारघर सेक्टर-१० मध्ये वास्तव्य करणारे पक्षी निरीक्षक प्रदीप चौधरी २१ नोव्हेंबर रोजी खारघर मध्ये पक्षी निरीक्षणासाठी गेले असता, खारघर सेक्टर-२५ लगत असलेल्या खारफुटीत ३ सोनेरी कोल्हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पक्षी निरीक्षक प्रदीप चौधरी यांनी तत्काळ ३ सोनेरी कोल्हे आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी प्रदीप चौधरी यांच्या सोबत पक्षीमित्र डॉ. सिध्दार्थ पवार देखील होते.

खारघर वसाहतीच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात खारफुटी परिसर आहे. हिवाळ्यात पाणथळ परिसरात देशी आणि विदेशी पक्षी वास्तव्यास येतात. तसेच सोनेरी कोल्ह्यांचा मुक्त संचार सुरु असतो, असे पक्षी निरीक्षक प्रदीप चौधरी यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भिवंडीतील अवैध भंगार गोदामे असुरक्षित