नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
वाशी सेक्टर-८ मधील जलउदंचन केंद्राची नव्याने उभारणी
नवी मुंबई : वाशी, सेक्टर-८ येथे असलेले सिडकोनिर्मित पावसाळी जलउदंचन केंद्र असून गेली ३५ ते ४० वर्षे जुने आहे. सद्यस्थितीत जलउदंचन केंद्राची दुरावस्था झालेली आहे. तसेच पपिंग मशिनरी जुनी आणि जीर्ण झालेल्या आहेत. याशिवाय उदंचन केंद्राची इमारत धोकादायक स्थितीत असल्याने सीबीडी मधील उदंचन केंद्राप्रमाणे ती तोडून नवीन बांधणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत सदर जलउदंचन केंद्राचा पाहणी दौरा केला.
दुसरीकडे आ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने ३७ कोटी रुपये उपलब्ध करुन सीबीडी मधील जुने जलउदंचन केंद्र निष्कासीत करुन सदर ठिकाणी नवीन जलउदंचन केंद्र (पंप हाऊस) बांधण्यात येणार आहे. सीबीडी, सेक्टर-८ येथे नवीन पावसाळी जलउदंचन केंद्र (पंप हाऊस) बांधणे बाबतचा आहे. या जलउदंचन केंद्राची इमारत सिडकोकालिन असून अंदाजे ३५ ते ४० वर्षे जुनी आहे. सद्यास्थितीत सदर जलउदंचन केंद्र (पंप हाऊस) ची दुरावस्था झालेली आहे. तसेच पम्पिंग मशीनरी जुनी आणि जीर्ण झालेली असल्याने येथील धोकादायक इमारत लवकरच तोडून नव्याने बांधली जाणार आहे.
त्याचअनुषंगाने वाशी, सेक्टर-६,७,८ येथील जलउदंचन केंद्राची इमारत लो लाईन क्षेत्रात असल्यामुळे येथे पावसाळा कालावधीत अतिवृष्टीमध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी शिरते. याकरिता सदरचे जलउदंचन केंद्र (पंप हाऊस) नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याकरिता आ. मंदाताई म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन आवश्यक बाबींची माहिती घेतली.
याप्रसंगी समाजसेवक मुकुंद विश्वासराव, विक्रम पराजुली, विकास सोरटे, प्रमिला खडसे, मालती सोनी, प्रताप भोसकर, रामकृष्ण अय्यर तसेच महापालिका कार्यकारी अभियंता अजय संखे, विभाग अधिकारी सागर मोरे तसेच संबंधित अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.