नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
‘महावितरण'चा कारभार सुधारा; अन्यथा आंदोलन
नवी मुंबई : ‘महावितरण'चा तकलादू कारभार सुधारा, अधिक काळ वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाईबाधितांना द्या. ‘महावितरण'तर्फे विद्युत पुरवठा सेवा आहे की ग्राहकधार्जिंना व्यवसाय? असा आरोप नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केला आहे.
सानपाडा पामबीच, वाशी सेक्टर-३० आणि जुईनगर मधील नागरिकांच्या शिष्टमंडळासह माजी विरोधी पक्षनेते तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दशरथ भगत यांनी ‘महावितरण'चे वाशी विभागीय अधीक्षक अभियंता संजय पाटील यांची २६ ऑगस्ट रोजी भेट घेऊन प्रभाग क्र. ६५, ७७, ७८ मधील वारंवार खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबद्दल निवेदन दिले.
संजय पाटील यांची यावेळी दशरथ भगत यांनी अधीक्षक अभियंता पाटील यांच्याशी चर्चा करताना इशारा दिला की, वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा आणि त्यामुळे होणारे नागरिकांना आणि व्यवसायिकांना नुकसान भरपाई द्यावी. यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार स्तरावर पंचनामे करुन घ्यावेत. तसेच विद्युत बिले आकारुन ग्राहकांकडून करोडो रुपये जमा करणाऱ्या ‘महावितरण'ने तात्पुरत्या स्वरुपातील थुकपट्टी स्वरुपात दुरुस्त्या न करता, तिन्ही प्रभागातील केबल्स, डीपी आणि जोडण्या नव्याने कराव्यात. अन्यथा आगामी काही दिवसांत ‘महावितरण' विरोधात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे होणाऱ्या शासकीय, वाहतूक, औद्योेगिक आणि रहिवास परिणामांस महावितरण सर्वस्वी जबाबदार असेल, असा इशारा दशरथ भगत यांनी यावेळी अधीक्षक अभियंता संजय पाटील यांना दिला.
यावेळी शिष्टमंडळात सानपाडा, सेवटर-३० रेल्वे स्टेशन परिसरातील महिला, जेष्ठ नागरिक, व्यापारी बांधव तसेच सानपाडा-पामबीच विभागातील नागरिक उपस्थित होते.