बेलापूर ते दिघा मधील अनधिकृत व्यवसाय जप्त

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग मार्फत  बेलापूर पासून दिघा विभाग पर्यंत रस्त्याच्या कडेला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत व्यवसायांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

या मोहीम मध्ये करणाऱ्या टपऱ्या, पीयुसी वाहने, खाद्य पदार्थ टेम्पो, पान टपरी, वडा पाव काउंटर, गॅस सिलेंडर, आईसक्रीम गाडया, थ्री व्हिलर टेम्पो, इत्यादींवर २१ ऑगस्ट  रोजी नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि उपायुवत (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभाग कार्यालय मार्फत पदपथावर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर हटविण्याची आणि सामान जप्तीची करवाई करण्यात आली आहे. जप्त केलेले सामान २१ ऑगस्ट रोजी कोपरखैरणे क्षेपणभुमी येथे जमा करण्यात आलेले आहे.

सदर कारवाईसाठी विभाग कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी पोलिस बंदोबस्तासह उपस्थित होते.

दरम्यान, रस्त्याच्या कडेला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत व्यवसायांवर जप्तीची कारवाई करण्याची मोहीम  यापूढे देखील तीव्र करण्यात येणार आहे, असे महापालिका उपायुवत (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सानपाडा सेक्टर-५ मध्ये वृक्षारोपण