सानपाडा सेक्टर-५ मध्ये वृक्षारोपण

नवी मुंबई : शिवतेज मित्र मंडळ (नवी मुंबईचा कैवारी) यंदा ३१व्या आणि नवी मुंबईचा राजा (सानपाडाचा महाराजा सार्वजनिक मंडळ) यावर्षी २५व्या वर्षात पदार्पण करीत असताना या दोन्ही श्रीगणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचे महत्व जाणत नुकतीच सानपाडा सेक्टर-५ मधील गावदेवी मैदान मध्ये वृक्ष रोपांची लागवड केली. या उपक्रमाची संकल्पना सानपाडा मधील सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांची होती. या उपक्रमात सदर दोन्ही श्रीगणेशोत्सव मंडळांचे सर्व सभासद, पदाधिकारी गणेशभक्तानी सानपाडा सेक्टर-५ मधील गावदेवी मैदानात उपस्थिती दाखवत पर्यावरणात प्राणवायू आणि फळे, फुले, सावली देणारी वड, आंबा, पिंपळ, चिंच, बदाम, जांभूळ अशा विविध वृक्ष रोपांची लागवड केली.

वृक्षांप्रमाणे दोन्ही श्रीगणेशोत्सव मंडळे समाजात आपले महत्त्व दिवसेंदिवस वाढवत असून, आप-आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. येणारा २०२४ गणेश उत्त्सव मोठ्या मंगलमय, धार्मिक, सांस्कृतिक वातावरणात साजरा केला जाणार असून, यापुढे देखील विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी  निश्चय केला आहे, असे सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 खारघर-तळोजा खाडी पुल उभारणीच्या कामाला सुरुवात