नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
लाडक्या बहिणीच्या खात्यात योजनेचे पैसे जमा
नवी मुंबई : जोपर्यंत राज्यात आहे महायुती आहे, तोपर्यंत तुमच्या संसाराला मिळेल गती मिळेल, याच अनुषंगाने वाशी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात आयोजित लाडक्या बहिणीचा लाडके देवा भाऊ' या कार्यक्रमाप्रसंगी रक्षाबंधनाचे औचित्य साधून शेकडो महिलांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना राखी बांधत आभार मानले.
त्याचबरोबर महिला-बाल विकास विभाग मार्फत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘लाडकी बहिण' योजना अंतर्गत १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गठीत करण्यात आलेल्या ‘समिती'च्या अध्यक्षा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑगस्ट रोजी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली होती. सदर बैठकीत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ‘लाडकी बहिण' योजनेच्या पोर्टलवर ठाणे तालुक्यातील एकूण १,८८,४७३ लाभार्त्यांच्या अंती पात्र योजेनेचा लाभ देण्यास अंतिम मान्यता दिली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्याची एकत्रित रक्कम ३ हजार रुपये जमा झाले.
सदर योजनेसाठी आमदार सौ. म्हात्रे यांच्या वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात हजारो महिलांचे अर्ज भरण्यात आले होते. त्याच अर्जाच्या माध्यमातून आज हजारो महिलांना लाभ मिळाल्याने सदर महिलांनी वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात सुवर्णा सुनिल भालेराव, मीना सरदेसाई यांच्यासह शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवून आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानून आनंद साजरा केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून यातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य विनियोग करतील. आमची बहीण लखपती झालेली मला पाहायची असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आवर्जुन सांगितले.
यावेळी मालती सोनी, वर्षा झरेकर, सुवर्णा चिकणे, लीला चव्हाण, कविताताई, रेखा गोदाम, देविका करपे, माधुरी सावंत, विद्या सावरकर, शीतल गांधी, सारिका पवार, विकास सोरटे, मुकुंद विश्वासराव, प्रताप भोसकर, महेश दरेकर, प्रवीण चिकणे, जेम्स आवारे तसेच महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.