पनवेल महापालिका तर्फे प्रारुप विकास योजना नकाशा प्रसिध्द

पनवेल : महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन-नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) अन्वये पनवेल महापालिका क्षेत्रासाठी सुधारित आणि एकत्रित प्रारुप विकास योजनाचे प्रसिध्दीकरण ८ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार पनवेल महापालिका क्षेत्रासाठी प्रसिध्द केलेले सुधारित आणि एकत्रित प्रारुप विकास योजनेच्या नकाशाबाबत नागरिकांना काही प्रश्न उद्‌भवल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी पनवेल महापालिका अग्निशमन इमारत, ३ रा मजला येथे विकास योजना कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या सुधारित आणि एकत्रित प्रारुप विकास योजनाचे नकाशे पनवेल महानगरपालिकेच्या www.panvelcorporation.com या वेबसाईटवर नागरिकांना अवलोकनार्थ उपलब्ध आहेत. सदर नकाशे ॲन्ड्रॉईड आणि आय फोनवर अगदी सहज डाऊनलोड करता येऊ शकतील, अशा स्वरूपात उपलब्ध आहेत. नकाशाची प्रत किंवा भागशः नकाशा पाहिजे असल्यास शुल्क आकारून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

पनवेल महापालिका क्षेत्रासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या सुधारित-एकत्रित प्रारुप विकास योजना बाबत नागरिकांना सूचना-हरकती घेण्याची मुदत योजना प्रसिध्द झालेपासून ३० दिवसात म्हणजेच ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. नागरिकांना याबाबत काही शंका असल्यास विकास योजना कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
-मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका.

सुधारित-एकत्रित प्रारप विकास योजनेच्या नकाशाबाबत काही प्रश्न उद्‌भवल्यास संपर्कासाठी अधिकारीः

वि्ील धायगुडेः मोबाईल क्र.- ८१०४७४९९७३.
गावाचे नाव -पनवेल, नागझरी, चाळ, घोट, धानसर, धरणगाव, धरणाकॅम्प, तुर्भे, पिसार्वे.
रणजीत कोरेः मोबाईल क्र.- ९९७०४२६७३७.
गावाचे नाव -रोहिंजण, बीड, आडवली, तळोजा मजकूर, कोयनावळे, करवले बुद्रुक.
अनिकेत दुर्गवलेः मोबाईल क्र. -७५०७०२१३६२.
गावाचे नाव- कळंबोली-रोडपाली, कामोठे, नवीन पनवेल, आसुडगाव, टेंभोडे, काळुंद्रे, खारघर, ओवे, देवीचा पाडा, पालेखुर्द.
शुभम गायकवाडः मोबाईल क्र. -४२०६०६६९९.
गावाचे नाव- पडघे, वळवली, तळोजे पाचनंद, नावडे, तोंडरे, पेंधर, खिडूकपाडा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 खारघर-सीबीडी कोस्टल रोडला ग्रीन सिग्नल