स्वयं - पुनर्विकास मार्गदर्शन आणि चर्चासत्र संपन्न 

नवी मुंबई :  धर्मवीर संभाजी राजे चॅरिटेबल  ट्रस्ट याच्या विद्यमाने स्वयं- पुनर्विकास मार्गदर्शन शिबीर आणि चर्चासत्राचे आयोजन रविवारी  नेरुळ येथील तेरणा डेंटल  कॉलेज सभागृहात अध्यक्ष दत्ता घंगाळे याच्या पुढाकारने आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरात  म्हाडाचे माजी अध्यक्ष तथा एमएमआरडीए सदस्य प्रा चंद्रशेखर प्रभू (राज्यमंत्री दर्जा ) तसेच स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील सदनिकाधारक सदस्य आणि विविध सोसायटी पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्वयं - पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या गृहनिर्माण  सोसायटी  सदस्य यांनी एकसंघ होऊन  स्वयं पुनर्विकास  करावा अन्यथा आपली फसवणूक अटळ असल्याचे आपल्या मार्गदर्शन पर भाषणात प्रभू यांनी  सांगितले.

यावेळी उपस्थितीत सदनिकाधारकांसमोर मार्गदर्शन करताना प्रा.चंद्रशेखर प्रभू यांनी, स्वयं - पुनर्विकास केल्यास बिल्डर देतो त्यापेक्षा अधिकचे  क्षेत्रफळ सदनिकाधारकांना कसे मिळू शकेल, कोरपस निधी अधिक कसा भेटू शकेल, कमी वेळेत आणि चांगल्या प्रतीचे बांधकाम कसे करता येईल, पैसे कसे आणि कोणत्या बँकिंग मार्गाने उभे राहतील, स्वयं- पुनर्विकास केल्यावर लाईफ टाईम मेंटेनन्स  फ्री होऊ शकते का?,

साडे बारा टक्के भूखंडावर असलेल्या इमारतीतील  सदनिकाधारकांना  स्वयं- पुनर्विकासाचा  लाभ मिळू शकतो का? नवी मुंबई मनपा स्वयं पुनर्विकास योजनेसाठी एक खिडकी योजना सुरु करेल काय आदि विषयावर माजी आमदार तथा माजी म्हाडा अध्यक्ष प्रा चंद्रसशेखर प्रभू यांनी उपस्थित हजारो सदस्य यांना मार्गदर्शन केले. शिबिरा नंतर आयोजित चर्चा सत्रात स्वयं पुनर्विकास करण्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी बाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले.

सदर मार्गदर्शन शिबीर यशस्वी करण्यासाठी आयोजक दत्ता घंगाळे यासह  दिगंबर  राऊत, प्रविण खेडकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नारळी पौर्णिमा निमित्त आगरी-कोळ्यांच्या उत्साहाला उधाण