भिवंडी महापालिकेत महारोजगार मेळावा संपन्न

भिवंडी : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत भिवंडी महापालिकेतील विविध पदांकरिता रिक्त जागेवर तात्पुरत्या स्वरुपात शिकाऊ कर्मचारी म्हणून घेण्यात येणार आहेत. याचा फायदा म्हाणजे जे नियुक्त केले जातील त्यांना स्थानिक प्रशासनाचा, प्रशासकीय कामकाजाचा अनुभव येईल. या प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यावर अनुभवाचा दाखला मिळणार आहे. शासनाकडून ६ महिन्यांकरिता दरमहा मानधन स्वरूपात रक्कम मिळणार आहे. सदर अनुभव आपल्या पुढील भविष्यातील वाटचालीस उपयोगी पडणार आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुवत अजय वैद्य यांनी केले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, महापालिकेत महारोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्‌घाटन आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर अतिरिवत आयुक्त वि्ील डाके, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त अनुराधा बाबर, सहाय्यक आयुक्त नितीन पाटील, समाज कल्याण विभाग प्रमुख नितेश चौधरी, ‘एनयुएलएम'चे कैलास पाटील उपस्थित होते.

महारोजगार मेळावा निमित्त महापालिकेतील विविध रिक्त पंदाकरिता उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया घेणसाठी थेट अर्ज भरुन नेमणुका करण्यात येणार आहेत. या पदांमध्ये कनिष्ठ अभियंता (विद्युत पाणीपुरवठा आणि बांधकाम स्थापत्य), भूभाग लिपीक, स्टेनो टायपिस्ट, कनिष्ठ अभियंता (सॉपटवेअर-हार्डवेअर), उपलेखापाल, सहाय्यक विधी अधिकारी, उपसमाज विकास अधिकारी,  स्वच्छता निरीक्षक, उप कामगार कल्याण अधिकारी, टेलिफोन ऑपरेटर, ग्रंथपाल सहाय्यक, अंतर्गत लेखा परीक्षक, लॅब टेक्निशन, प्रयोगशाळा सहाय्यक, मिश्रक (फार्मासीस्ट), प्राथमिक शिक्षक अशा एकूण २०३ पदांकरिता रोजगार मेळाव्याद्वारे भरतीचे अर्ज भरुन घेण्यात आले आहे. या अर्जांची छाननी करुन पात्र उमेदवारांना महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात येणार असल्याची माहिती आयुवत अजय वैद्य यांनी यावेळी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वयं - पुनर्विकास मार्गदर्शन आणि चर्चासत्र संपन्न