नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
कल्याणमध्ये खड्ड्यांविरोधात ‘युवक काँग्रेस'चे आंदोलन
कल्याण : गणेशोत्सवाला अवघा एक महिना राहिला असून अद्यापही शहरांतील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाही आहे. उलट या खड्डेयुक्त रस्त्यांमुळे शहरात २-२ तास वाहतूक कोंडी होत आहे. त्याविरोधात १४ ऑगस्ट रोजी ‘युवक काँग्रेस'तर्फे आंदोलन करण्यात आले. येथील शहाड पुल परिसरात युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन करत रस्त्यावरील खड्ड्यात रांगोळ्या काढत प्रशासनाचा निषेध केला. तर चुकून रस्ता दिसला तर दचकू नका, पुढे खड्डे आहेत... अशी बॅनरबाजी देखील केली. या अनोख्या बॅनरबाजीने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले होते.
कल्याण-डोंबिवली मधील अंतर्गत आणि प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळणी झाली असून नागरिक तर मेटाकुटीला आले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज तासन् तास वाहतूक कोंडी होण्यासह नागरिकांना मणक्याचे आजारही झाले आहेत. परंतु, त्यानंतरही केडीएमसी प्रशासन अजिबात त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
त्यामुळे या विरोधात ‘कल्याण शहर युवक काँग्रेस'च्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले. शहाड पुल परिसरातील रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये बसून या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.
जनतेचे हाल होत असूनही केडीएमसी प्रशासनाला त्याचे काही देणेघ्ोणे नसल्याचे सांगत ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला. तर खड्डे बुजविण्यासाठी २२ कोटींचे टेंडर ‘व्ोÀडीएमसी'ने पास केले आहे. खड्डे बुजविण्यासाठी आणलेल्या मशीन धूळखात पडून आहेत. नितीन गडकरी सांगतात मी १० लाख करोड, १५ लाख करोडचे हायवे बनवतो. पण, या हायवेला जायला रस्ता नाही. कल्याणला येणारे-जाणारे सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे येत्या ३ ते ४ दिवसांत खड्डे न बुजविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ‘युवक काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांनी दिला आहे.
याप्रसंगी कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह ‘युवक काँग्रेस'चे महाराष्ट्र प्रभारी विवेक यगवल, कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी, राकेश मुथा, लालचंद तिवारी, अरुण वायले, वैशाली वाघ, लता जाधव, शेखर पोटे, अमित म्हात्रे, वर्षा रसाळ, भूषण बेंद्रे, रोहित कदम, ब्लॉक अध्यक्ष प्रवीण साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.