नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
नवी मुंबई पोलिसांच्या व्हाट्सअप चॅनलचे पोलीस महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन
नवी मुंबई : मुली सेल्फी घेतात, त्यानंतर समाज माध्यमांवर ते फोटो पोस्ट करतात. मात्र त्याचा सायबर गुन्हेगारांकडून दुरुपयोग होवू शकतो. सेक्सॉटर्शच्या पध्दतीचा वापर करुन सायबर गुन्हेगारांकडुन ब्लॅकमेलींगचे प्रकार सुरू आहेत, त्यामुळे समाज माध्यमांवर तुमचे कितीही मित्र मैत्रिणी असले, तरी आपले फोटो अनोळखी लोकांना पाठवू नका. तसेच आपले लोकेशन सांगत राहू नका, असे आवाहन राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी बुधवारी वाशीत केले.
नवी मुंबई पोलिसांनी शहरातील वाढते सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, अमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला सुरक्षेसंदर्भातील गुह्यांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये त्याबाबत जनजागृती करण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल सुरु केले आहे. या व्हॉट्सऍप चॅनलचे व सायबर गुह्यांशी संबधीत हेल्पलाईनचे उद्घाटन बुधवारी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्या हस्ते वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी रश्मि शुक्ला यांनी सायबर गुन्हे किंवा समाज माध्यमांवरील फसवणूक, ब्लॅकमेलींग यासारखे गुन्हे घडल्यानंतर घाबरुन न जाता सर्वप्रथम आपल्या आईवडीलांशी संवाद साधा. कारण ते तुमचे हितचिंतक आहेत, त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना सगळी माहिती सांगा. जेणे करुन तुम्हाला मदत करता येईल, असेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.
नवी मुंबई पोलिसांनी सुरु केलेल्या व्हॉट्सऍप चॅनेल व हेल्पलाईनचा सर्वांनाच फायदा होणार आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. सायबर फसवणुक होऊ नये यासाठी तसेच फसवणुक झाल्यास काय करावे? याबाबत नागरिकांमध्ये सजगता निर्माण होणार आहे. नवी मुंबईत सुरु करण्यात आलेल्या या पायलट प्रोजेक्टला नागरिकांकडुन कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून हा प्रकल्प संपुर्ण राज्यात राबवण्याचा विचार केला जाईल असेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तर पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात नव्याने सुरु करण्यात आलेल्या व्हॉट्सऍप चॅनल व हेल्पलाईन बाबत माहिती देताना, नवी मुंबईसह संपुर्ण देशामध्येच सायरब क्राईम व आर्थिक गुह्यांचे प्रमाण झपाटÎाने वाढत चालल्याचे सांगितले. चोरी, घरफोडी, दरोड या सारखे नियमित घडणाऱया गुह्यांच्या तुलनेत सायबर क्राईम आणि आर्थिक गुह्यात प्रचंड वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी सजगता ठेवली, तसेच सायबर गुन्हेगार कोणत्या पद्धती वापरतात याची नागरिकांना माहिती झाल्यास अशा ग्ह्यांना आळा घालण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर करुन नागरिकांमध्ये सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, अमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला सुरक्षेसंदर्भातील गुह्यांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी सांगितले. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे अधिकृत व्हॉट्सऍप चॅनल सुरु करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या व्हॉट्सऍप चॅनलवर सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, अमली पदार्थ विरोधी गुन्हे, महिला सुरक्षेसंदर्भात तयार करण्यात आलेले जनजागृतीपर व्हिडीओ, मिम्स, डिजीटल पोस्टर्स दररोज पाठविले जाणार आहेत.
त्यानंतर देखील नागरिकांना काही शंका असल्यास त्यांच्यासाठी 88281112112 ही सायबर हेल्प लाईन सुद्धा सुरु करण्यात आल्याचे भारंबे यांनी सांगितले. या हल्पलाईनवर 24 तास ऑपरेटर उपलब्ध राहणार असून त्यावर सायबर क्राईम व आर्थिक ग्ह्यांशी संबधीत नागरिकांना काही शंका व त्याबाबत माहिती हवी असल्यास त्यावर संपर्क साधता येणार आहे. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शहरातील प्रतिष्ठित नागरीक मोठÎा संख्येने उपस्थित होते.