नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
मेघ मल्हार सोबत रंगली ‘संवेदना' संस्थेची ‘घागर घुमू दे मंगळागौर'
पनवेल : येथील संवेदना संस्थेने आयोजित केलेली १० ऑगस्ट रोजी आयोजित केलेली मंगळागौर श्रावणातील विविधरंगी इंद्रधनू रंग छटांनी सजली. फुगड्यांच्या खेळात रंगली. यंदा साजऱ्या झालेल्या घागर घुमू दे या मंगळागौर खेळाची संकल्पना मेघ-मल्हार संगीतातील मेघ-मल्हार हा राग होती.
पारंपरिक मंगळागौरीला आधुनिकतेची झालर चढवून ही मंगळागौर साजरी झाली. दरवर्षी उत्कृष्ट मंगळागौर खेळ खेळणाऱ्या महिलेला संवेदना श्रावण क्वीन या पुरस्काराने सन्मानित केले जाते. या वर्षी या पुरस्काराची मानकरी ठरलेल्या अनिता सावंत हिला संस्थेच्या वतीने भेटवस्तू ट्रॉफी आणि मानाचा मुकुट घालून गौरवण्यात आले. या खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इतरही महिलांचे छोटीशी भेटवस्तू आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा गवाणकर यांनी संवेदना संस्थेचे मंगळागौर खेळाचे १४ वे वर्ष असल्याचे सांगितले. या वेळी कोपरखैरणे, कळंबोली, कामोठे, पनवेल, अलिबाग, पेण, ठाणे, पुणे परिसरातूनही येऊन महिलांनी हजेरी लावली आणि या खेळाचा मनमुराद आनंद घेतात. या कार्यक्रमाच्या अतिथी, परीक्षक म्हणून गुजराथी स्कूल पनवेलच्या मुख्यध्यापिका नंदिनीताई भाटकर, कवयित्री रेश्मा कारखानीस यांनी परीक्षणाचे काम पाहिले. कार्यक्रमाची सांगता वारकरी फुगडी आणि वि्ील नामाचा गजर करून करण्यात आली