लालपरीचा प्रवास महागला; रिक्षा-टॅक्सीचीही भाडेवाढ

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून प्रलंबित असलेल्या सर्वसामान्यांच्या एसटी बस प्रवासाच्या भाडेवाढीला राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. ‘एसटी'ची भाडेवाढ २५ जानेवारी पासून लागू होणार आहे. ‘एसटी'च्या तिकीटात १४.९५ टक्के म्हणजेच जवळपास १५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. भाडेवाढ झाल्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचा ‘लालपरी'तून प्रवास ६० ते ८० रुपयांनी महागणार आहे. दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्चभूमीवर गेली ३ वर्षे ‘एसटी'ची भाडेवाढ करण्यात आली नव्हती.

‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ'च्या बसेससह खासगी वाहनांचा प्रवास देखील महागणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून प्रलंबित असलेल्या ‘एसटी'ची च्या भाडेवाढीला राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘एसटी'च्या तिकीटात १४.९५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. ‘राज्य परिवहन महामंडळ'एसटीच्या बसेसमधून प्रवास आता महागणार असून एसटी दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांआधी एसटी दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर आता महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ‘राज्य परिवहन प्राधिकरण'ची बैठक झाली. या बैठकीत ‘एसटी'च्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ‘एसटी'च्या तिकीटात १४.९५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मुंबईमधील प्रवाशांसाठी सदर नवे दर लागू होणार आहेत, असे ना. प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. नवीन दर कधीपासून लागू होणार? याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र, ‘एसटी'चे नवीन तिकीट दर २५ जानेवारी पासूनच लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे टॅक्सी आणि रिक्षा प्रवासामध्ये ३ रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. टॅक्सी सध्याचे किमान दर २८ रुपये आहेत, ते आता नवीन दरवाढीनुसार ३१ रुपये होतील. तसेच रिक्षाचे सध्याचे किमान दर २३ रुपये असून नवीन दरवाढीनुसार ते २६ रुपये इतके होणार आहेत. रिक्षा-टॅवसीची भाडेवाढ २ फेब्रुवारीपासून लागू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली आहे. 

दुसरीकडे राज्य परिवहन विभागाने ‘एसटी'ची दरवाढ केल्यानंतर मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढही लागू होणार आहे. गेल्या काही वर्षापासून टॅक्सी आणि रिक्षा यांची ३ रुपयांनी भाडेवाढ करण्याची मागणी होती. सदर भाडेवाढ होणे गरजेचे आहे, अन्यथा आमचे जगणे मुश्किल होईल, असे रिक्षा-टॅवसी चालकांचे म्हणणे आहे. त्यानुसार आता टॅक्सी आणि रिक्षाचाही प्रवास महागला आहे.

मुंबईकरांचाही प्रवास महागला!
‘एसटी'पाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. ऑटो रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागली आहे. टॅक्सीचा दर ४ रुपये प्रति कि.मी.ने तर रिक्षाचा दर ३ रुपये प्रति कि.मी.ने वाढणार आहे.

वाढत्या सीएनजी दरामुळे आणि रिक्षांचा दुरुस्तीचा खर्च वाढल्याने चालकाला भाडे परवडत नसल्याने रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यामुळे सदरची भाडेवाढ करण्यात आली असे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी २०२२ मध्ये भाडेवाढ झाली होती. तेव्हा २ रुपयाने भाडेवाढ झाली होती. त्यावेळी रिक्षा पहिला मीटर २१ रुपयांवरुन २३ रुपये झाला होता. तर टॅक्सीचा दर २५ रुपयांवरुन २८ रुपये झाला होता. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याचा पुर्नवापर करण्यावर भर -आयुक्त सौरभ राव