नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
मेडिकवर हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम; बेबी फुटप्रिंट ऑफ करेजचे अनावरण
खारघरः मेडीकवर हॉस्पिटलने जागतिक प्रीमॅच्युरिटी दिनानिमित्च विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जनजागृतीपर सत्र आणि मुदतपूर्व जन्माच्या प्रवासाचा अनुभव घेतलेल्या कुटुंबांकडून त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेण्यात आले. अकाली प्रसुतीविषयी जागरूकता वाढवणे, नवजात बालकांच्या काळजी कशी घ्यावी याबाबत जागरुकता आणि या कुटुंबांना जोडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, असा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यानिमित्ताने ‘बेबी फूटप्रिंट ऑफ करेज'चे अनावरण करण्यात आले.
गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळांना जन्मापासूनच अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या लहान योध्यांना रेस्पिरेटरी सिंड्रोम, इंट्राव्हेंट्रिक्युलर ब्लीडींग, नेक्रोटाइझिंग एन्टरोकोलायटिस आणि दीर्घकालीन विकासाच्या समस्यांसह विविध गुंतागुंतीचा धोका असतो. गरोदर मातांमध्ये मुदतपूर्व प्रसूतीची कारणे ही गर्भधारणेतील संसर्गापासून ते मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशी असू शकतात. अकाली जन्माचे गंभीर स्वरुप ओळखून आणि या लहान योध्यांचा सन्मान करण्यासाठी मेडिकवर हॉस्पिटलने विविध उपक्रमांचे आयोजन केल्याची माहिती डॉ. तनमेश कुमार साहू (बालरोग-नवजात शिशू तज्ञ) यांनी दिली.
मिरॅकल्स ॲट मेडीकवर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे अकाली जन्मलेल्या आणि नवजात बालकांच्या देखभालीचे महत्त्व आणि जागरुकता वाढविणे. याठिकाणी उपस्थित तज्ज्ञांनी नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी आणि अकाली जन्मलेल्या बाळांच्या लढाईवर चर्चा केली. सपोर्ट ग्रुप सेशनमध्ये सहभागी झालेल्या कुटुंबांनी त्यांचे अनुभव सादर केले आणि संपुर्ण टीमचे आभार मानले. कांगारू केअर, मुदतपूर्व अर्भकांसाठी स्तनपान आणि विकासात्मक काळजी या विषयांवर तज्ञांच्या नेतृत्वाखाली चर्चा करण्यात आली, अशी माहिती प्रसुती-स्त्री रोग तज्ञ डॉ. कल्पना गुप्ता यांनी दिली.
जागतिक प्रीमॅच्युरिटी डे आमच्यासाठी मुदतपूर्व बाळांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या यशस्वी लढाईचे कौतुक करण्याची संधी आहे. त्याचबरोबर नवजात बालकांच्या काळजीमधील आव्हाने आणि प्रगतीबद्दल समाजाला शिक्षित करण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला होता. गुंतागुंतीच्या प्रकणांमध्ये यशस्वीपणे प्रसुतीसाठी मेडीकवर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. रुग्णालयाचे नवजात अतिदक्षता विभाग अत्याधुनिक इनक्यूबेटर, व्हेंटिलेटर आणि मॉनिटरिंग सिस्टमसह सुसज्ज आहे,
ज्यामुळे मुदतपूर्व अर्भकांसाठी सर्वोत्तम सुविधा सुनिश्चित केली जाते. याठिकाणी नवजात बालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व स्तरांवर सुविधा व उपचार पुरविण्यासाठी अनुभवी नवजात तज्ञ, बालरोग तज्ञ आणि विशेष प्रशिक्षित नर्सेसची टीम अशी २४ तास उपलब्ध असते, असे हॉस्पीटलचे केंद्रप्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता यांनी स्पष्ट केले.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    