विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचा रुट मार्च

कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण मध्ये पोलिसांचा रुट मार्च काढण्यात आला. ‘कल्याण'चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली सदर रुट मार्च काढण्यात आला.

कल्याण पश्चिम मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या रुट मार्चला सुरुवात करण्यात आली. पुढे शंकरराव चौक, आचार्य अत्रे रंगमंदिर, गांधी चौक, दुधनाका, पारनाका, टिळक चौक, अहिल्याबाई चौक, सहजानंद चौक, आग्रा रोड, लाल चौकी मार्गे दुर्गा माता चौक येथे या ‘रुट मार्च'ची सांगता करण्यात आली. या ‘रुट मार्च'मध्ये ‘एसआरपीएफ'चे जवान आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे शेकडो पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दारु दुकानाविरोधातील यशानंतर आता पर्यावरणासाठी काम