सीबीडी उड्डाणपुलाखाली बैठक व्यवस्था-प्रवासी निवारा शेड सुविधा

नवी मुंबई : सीबीडी उड्डाणपुलाखालून एसटी परिवहन महामंडळाच्या तसेच खाजगी बसेस सायन-पनवेल महामार्गावरून पुणे, सातारा, कोल्हापूर, कात्रज, औरंगाबाद, नगर अशा विविध ठिकाणी दररोज प्रवास करीत असतात. परंतु, सायन-पनवेल महामार्गावरील सीबीडी-कोकण भवन येथील बस स्थानकावर प्रवासी निवारा शेड नसल्याने येथील प्रवाशांना आपल्या लहान बाळांसह माता भगिनींना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तीनही त्रतूत बसची वाट बघत उभे राहावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याअनुषंगाने प्रवाशांच्या मागणीनुसार ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून २० लाख रुपये खर्च करुन सीबीडी उड्डाणपुलाखाली बसण्याची व्यवस्था आणि प्रवासी निवारा शेड उभारण्यात आली आहे. या सुविधेचे लोकार्पण आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक प्रभाकर कांबळे आणि बलबीरसिंग चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

 सीबीडी, बेलापूर, आग्रोळी आणि आसपासच्या परिसरातील, गावांतील प्रवासी याच ठिकाणाहून ये-जा करीत असतात.  तसेच नवी मुंबई शहरातील प्रवासी व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी रोज पुणे, सातारा, बुलडाणा, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, नागपूर, धुळे, येथे दररोज व्यापारासाठी आणि कामानिमित्त ये-जा करीत असतात. परंतु, सदर ठिकाणी प्रवासी शेड नसल्यामुळे प्रवाशांना एखादा आसरा शोधत थांबून बसची प्रतिक्षा करावी लागत होती. आता या प्रतिक्षेला पूर्णविराम लागल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

याप्रसंगी ‘भाजपा'चे माजी जिल्हाध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, विनय गायकवाड, बंडू मोरे, हस्तीमल जैन, नानजी भाई, संजय ओबेरॉय, जयदेव ठाकूर, अंशू पालांडे, माणिक गायकवाड, जयराम पासवान, अजय वर्मा, गणेश इंदोरे, ढोरे, बागले, किशन राठोड, निलेश पाटील, जाधव, गावडे, देविका करपे, शकुंतला गावित, मनिषा जाधव, शीतल गांधी, माधुरी यामा, सारिका राठोड, विद्या सावरकर, चैताली ठाकूर, सुमन बामणकर, अलका कामत, देवयानी मुकादम, मीना ओझा तसेच इतर महिला व प्रवासी नागरिक उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘सिडको'तर्फे उपलब्ध सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ