गृहसंकुलात दारुचे दुकान; महिलांवरील गुन्ह्यांना आमंत्रण?

पनवेल : गृहनिर्माण संस्थेच्या दारात सुरु असलेले दारुचे दुकान म्हणजे महिलांविरोधातील गुन्ह्यांना निमंत्रण असल्याचे निदर्शनास आणून देत ५० गृहिणींच्या गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पनवेल येथील त्यांच्या संकुलात दारुचे दुकान सुरु करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले. 

पुनर्विकासाअंतर्गत असलेल्या दुसऱ्या इमारतीतून दारुचे दुकान पनवेल मधील एनके हेरिटेज को-ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये स्थलांतरीत केले जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सदरचा मुद्दा उपस्थित करताना, ‘ॲलर्ट सिटीझन्स कमिटी'चे निमंत्रक कार्यकर्ते बी. एन. कुमार यांनी बरेच ग्राहक वाईन शॉपमधून दारु विकत घ्ोतात आणि दुकानाबाहेर मद्यपान करतात. गट एकत्र येतात आणि स्त्रिया आणि मुलींच्या विरोधात वाईट टिका करतात. सदर गृहसंकुलात किराणा, फळे अशी अनेक दुकाने असल्याने अनेक महिला तेथे खरेदीसाठी येत असतात. असे असताना हौसिंग सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच दारुचे दुकान सुुरु होत असल्याचे म्हटले आहे. 

परिसरातील अनेक मद्यपी बार आणि दुकानातून दारु पिऊन त्रास देतात. त्यांच्याकडून धोका आमच्या कंपाऊंडमध्ये पसरु नये, अशी आमची इच्छा असल्याचे सोसायटीतील गृहिणीने नमूद केले आहे. यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो, असे कुमार म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी यात समस्या निर्माण होण्याआधीच ती सोडवावी, अशी विनंती कुमार यांनी केली आहे. आगामी धोक्याच्या विरोधात सोसायटी सदस्यांनी मूक मानवी साखळीचे आयोजन केले होते. त्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.

 दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागांना एनके हेरिटेज, पनवेल येथील सदर दारूच्या दुकानाला परवानगी देऊ नये असे निर्देश देण्याची मागणी एन के हेरिटेज गृहनिर्माण संस्थेने केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 घारापुरी ग्रामपंचायतीला टीबी मुक्त ग्रामपंचायत प्रमाणपत्र प्रदान