नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
गेल्या दोन वर्षांपासून दिव्यांग स्टॉल वाटपाच्या प्रतिक्षेत
वाशी : नवी मुंबई महापालिका मार्फत दिव्यांग व्यक्तींचे रोजगाराच्या माध्यमातून सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने दिव्यांग व्यवतींना स्टॉल वितरीत करण्यात आले आहेत. नवी मुंबई शहरातील ३३० दिव्यांगांना सोडत पध्दतीने व्यवसाय स्टॉल देण्यात आले आहेत. मात्र, यातील काही स्टॉल अजून सुरु केले नसल्याने वाशी परिसरात मागील दोन वर्षांपासून दिव्यांग स्टॉल धूळखात पडले आहेत.
दिव्यांगांकरिता नवी मुंबई महापालिका द्वारे विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. नवी मुंबई शहरातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा आणि स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची यादी निश्चित झाली आहे. मात्र, काही करणात्सव दिव्यांगांना अद्याप स्टॉल वितरित करण्यात आलेले नाहीत. दिव्यांगांकरिता ३३० स्टॉल सज्ज आहेत. सध्या नवी मुंबई शहरातील वाशी, घणसोली येथील मोकळ्या भूखंडावर दिव्यांग स्टॉल उभे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दिव्यांग स्टॉल वाटप प्रक्रिया सुरु असून, सदर दिव्यांग स्टॉल वाटप प्रवि्रÀया कधी पूर्ण होणार?, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते शंकर पडुळकर यांनी उपस्थित केला आहे.
बेलापूर पासून दिव्यांगाना स्टॉल वितरणाला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत २०० स्टॉल देखील वितरीत करण्यात आले आहेत. मात्र, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्याच विभागात स्टॉल हवा आहे. त्यामुळे पुन्हा सर्व यादी नव्याने तयार करण्यात येणार असून, लवकरच दिव्यांग स्टॉल वितरण यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग स्टॉल मध्ये विशिष्ट वस्तूची विक्री करण्याची अट देखील शिथिल करण्यात आली आहे. - डॉ. राहुल गेठे, उपायुक्त (मालमत्ता विभाग) - नवी मुंबई महापालिका.
विभाग दिव्यांग स्टॉल संख्या
बेलापूर १४
नेरुळ ५४
वाशी ५७
तुर्भे १६
कोपरखैरणे २४
घणसोली ५७
ऐरोली ९०
दिघा १८